महावीर जयंती : सकल जैन संघाचे आयोजनबडनेरा : बडनेऱ्यात वर्धमान सकळ जैन संघाच्यावतीने महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले. ठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. सकल जैन संघाच्यावतीने जैन स्थानक येथून भगवान महावीरांची शोभायात्रा काढण्यात आली. सुभाष चौक मार्गे निघालेली शोभायात्रा आठवडी बाजार परिसर, जयस्तंभ चौक मार्गाने महावीर भवन येथे विसर्जित झाली. शोभयात्रेचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले, शोभायात्रेत शहरवासीय देखील सहभागी झाले होते. महावीर भवन येथे प्रवचन घेण्यात आले. दोन दिवस महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. निबंध स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. दोन दिवस बडनेरा शहरात महावीर जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण होते. प्रामुख्याने सुदर्शन गांग, मोहनलाल ओस्तवाल, राजेंद्र देवडा, प्रदीप जैन, कंवरीलाल ओस्तवाल, सुशील कोटेचा, संजय कटारिया, अशोक बोकरिया, नरेंद्र गांधी, महावीर देवडा, राजेंद्र कोटेचा, रामू कामदार, संजय बोबडे, मदन देवडा यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. महाप्रसादाने जयंती उत्सवाची सांगता झाली. शोभायात्रेत बडनेरा पोलीस तैनात होते. (शहर प्रतिनिधी)शोभायात्रेसाठी पोलीस बंदोबस्त तैनातकायदा सुव्यवस्था अबाधित राहावा, यासाठी पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार बडनेऱ्यात आयोजित महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रेत पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने तैनात होता. गतवर्षीपेक्षा यंदा बंदोबस्तासाठी पोलीस संख्येने अधिक असल्यामुळे आयोजकही गोंधळून गेले. मात्र कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने महावीर जयंतीनिमित्त बंदोबस्त लावण्यात आला होता, हे विशेष !
बडनेरात जंगी शोभायात्रा
By admin | Published: April 20, 2016 12:26 AM