लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा फटका संत्राबागांना व परिणामी शेतकऱ्यांना बसणार आहे.तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर जमिनीवर संत्राबागा आहेत. नऊ प्रकल्प असले तरी यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने ते प्रकल्प कोरडे झाले आहेत. आता या प्रकल्पांमध्ये केवळ ५ ते १५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. सिंचन विहिरींची पातळीसुद्धा खालावली असल्याने दिवसभर चालणारे पंप केवळ अर्धा तासांवर आले. भूजल पातळी ६० ते ७० फुटांवर गेलेली असल्याने तालुक्यातील हजारो हेक्टरमधील बागा सलाइनवर लागल्याने ठिबकद्वारे जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न संत्राउत्पादकांनी सुरू केला आहे. शेतकºयांच्या टाळूवरचे लोणी खाणारे दलाल सक्रिय असून, अधिकाºयांचे नाव सांगून लाखो रुपये उकळत असल्याची खमंग चर्चा आहे. हजारो रुपयांनी शेतकºयांची लूट केली जात आहे. यातच भारनियमनाचा फटका बसत असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.तालुक्यात ४०० पेक्षा अधिक संत्राकलमा तयार करणारे नर्सरीधारक शेतकरी आहे. यावर्षीही कोट्यवधी कलमांची लागवड आहे. आंबिया बहर आणि मृग बहराची संत्राफळे टिकवायची कशी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मृग बहराची फळे तोडून केवळ बागा जगविण्याच्या प्रयत्नात पाण्यावर लाखो रुपये पाण्यावर खर्च होत आहेत. याच संधीचा फायदा घेऊन बोअर करून देणारे दलाल सक्रिय झाले आहेत. ‘अधिकाºयांचे आम्ही अॅडजस्ट करतो’, असे सांगून रात्रीच्या वेळी बोअर करून शेतकºयांची लूट होत आहे.दलालांच्या जोखडातून मुक्तता देवून अधिकाºयांनी शेतकºयांना बोअर करू द्यावे, अन्यथा आम्ही संत्रा जगविण्याकरिता वाटेल तेथून पाणी घेऊ, असा पवित्रा संतप्त शेतकºयांनी घेतला आहे.झाडेच नव्हे, कलमाही मृत्यूच्या दाढेतवरूड तालुक्यात भूूगर्भातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्याने हजार ते बाराशे फुटांवर भूजल पातळी गेली आहे. हा अतिशोषित भाग म्हणून भूजल सर्वेक्षण विभागाने घोषित केला. यामुळे नवीन विहिरी, बोअर करण्यावर कायदेशीर बंदी आहे. ऐनवेळी पाण्याचे स्रोत कोरडे पडल्यास शेतकºयाकडे कोणताही पर्याय उरत नसल्याने हजारो संत्रा झाडे आणि लाखो कलमा मृत्यूच्या दाढेत जाण्याची शक्यता आहे.भूजल पातळी खालावली; सरकार गप्प का?गेल्या दोन दशकांपासून वरूड तालुका ड्राय झोनमध्ये आहे. त्यामधून बाहेर काढण्याचे आजी-माजी आमदारांचे प्रयत्नही निष्फळ ठरले. जलयुक्त शिवार योजनासुद्धा ठेकेदारांसाठी हिरवे कुरण ठरल्या आहेत, तर शेतकरी आजही उपाशीच आहे. दिवसेंदिवस भूजल पातळी खालावत आहे. सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. मात्र, आता शेतकरी कुणालाच घाबरणार नाहीत. विदर्भाचा कॅलिफोर्निया वाळवंटाच्या मार्गावर असताना सरकार गप्प का, असा सवाल भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांनी केला.बोअरकरिता सव्वा लाखांचा दंडवरूड तालुका ड्राय झोनमध्ये असताना, विहिरी व बोअर करण्यास मनाई आहे. परंतु, काही प्रमाणात बोअरचे काम सुरू होते. अशा तीन मशीन जप्त करून शेतमालक, दलाल, मशीनमालक आणि वाहनचालकाविरुद्ध कारवाई करुन तब्बल १ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.
वरूड तालुक्यात बागा सलाईनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:00 PM
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा फटका संत्राबागांना व परिणामी शेतकऱ्यांना बसणार आहे.
ठळक मुद्देभूजल जलपातळीत कमालीची घसरण : २० हजार ६०० हेक्टर जमिनीतील संत्राबागेला कोरड