शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

बालकीर्तनकार ‘तुलसी’ने जिंकले व्यासपीठ

By admin | Published: October 29, 2015 12:35 AM

वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये सहभागी शेकडो कीर्तनकारांच्या मांदियाळीमध्ये चिमुकली ...

राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सव : गुरुदेव भक्त गहिवरले, शेकडोंची उपस्थिती गुरुकुंज मोझरी : वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये सहभागी शेकडो कीर्तनकारांच्या मांदियाळीमध्ये चिमुकली बालकीर्तनकार तुलसी यशवंत हिवरेने जिंकले राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे व्यासपीठ. वं. महाराजांच्या व्यासपीठावरुन आजपर्यंत हजारो कीर्तनकार निर्माण झाले. अनेकांचे ते प्रेरणास्थान ठरले तर काहिंनी त्या व्यासपीठावरुन समाज प्रबोधनाचा वसा घेण्याचा ध्यास मनी धरला. अशा या मानवेतच्या महान पुजाऱ्याच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या व्यासपीठावरुन खेळण्या बागळण्याच्या अवघ्या ९ वर्षाच्या वयात गंभीरतेने सादर करणे खरोखरच अवर्णीय विदर्भाचे नंदनवन असलेल्या नागपूर येथील हुडकेश्वर भागातील इंगोले नगरातील रहिवासी यशवंतराव हिवरे यांनी ही तिसऱ्या वर्गात शिकणारी चिमुकली बालकीर्तनकार. यंदा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ४७ व्या व्यासपीठावरुन महिलोन्नती या २० अध्यायाचा परिपूर्णपण्े आधार घेत आपल्या बोबड्या बोलातून स्त्रीजीवनाची कहानी आजच्या समाजापुढे कीर्तनाच्या माध्यमातून मांडली. यावेळी तुलसी म्हणाली ‘तुम्हाला तुमच्यावर नितांत प्रेम करणारी आई पाहिजे, बहिण पाहिजे, पत्नी पाहिजे मग मुलगी का नका?’ भीमराव आंबेडकरांना जन्माला घालणारी भीमाबाई, महात्मा जोतिबा फुलेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी सावित्रीबाई आणि इंग्रजांच्या अत्याचाराविरुध्द लढणारी राणी लक्ष्मीबाई यापण् स्त्रीच्याच रुप होत्यांना ? मग आज समाजात स्त्रीचे स्थान नगण्य का? अशा शेकडो प्रश्नांचा भडीमार आपल्या कीर्तनातून समाज मनावर यावेळी तुलसीने केला. समाजातील या अप्रवृत्तीला वेळीच आळा घाला. तेव्हाच उद्याचा सशक्त समाज सन्मानाने जागू श्केल. आज मुलांना हुंडा देण्याची प्रथा व अप्रवृत्ती दिसून येते. उद्याला कदाचित मुलींची घटती संख्या पाहून त्यांनाही हुंडा द्यावा लागेल. आज महाराष्ट्राच्या नकाशावर मुलींच्या संख्येचा आलेख दिवसेंदिवस कमीच होत आहे. तर दुसरीकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनामुळे विश्वापुढे आपली मान झुकते आहे. हम दो हमारे दो च्या नाऱ्याने अनेकांच्या आईवडिलांना वृध्दाश्रमाची पायरी ओलांडण्यास भाग पाडले. अशा शब्दात या चिमुरड्या कीर्तनकाराने समाजमनाचा ठाव घेतला. यावेळी परिसरातील मोझरी, गुरुदेव नगर, शिरजगाव मोझरी, अनकवाडी, शेंदोळा खुर्द, कापुसतळण्ी या गावातून शेकडो भक्त उपस्थि होते.