पान २ साठी
नांदगाव खंडेश्वर : दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन शेतकरी विरोधातील तीन कायद्यांच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने नांदगाव खंडेश्वर येथे शुक्रवारी बैलबंडी मार्च काढण्यात आला. केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा. शेतमालाला दीडपट आधार भावाने संरक्षण द्या. वीज बिल विधेयक २०२० मागे घ्या, या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सहसचिव श्याम शिंदे, तालुकाध्यक्ष अनिल मारोटकर, दिलीप महल्ले, मोहसीन शेख, प्रभाकर सुने, देवाजी पाटील, आकाश मगर, शहंशहा, ज्ञानेश्वर शिंदे, मारुती बंड, कांतेश्वर पुंड, संजय वसावकर, पुंडलिक पुंड, इरफान खान, आशिष रावेकर, दामोदर कठाणे, आशिष लांडगे, नारायणगाव गावफळे, दिगंबर घोडे व शेतकरी मंडळी उपस्थित होती.
--------------------