चेतन घोगरे।लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : वाढत्या तापमानाने पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. तद्वतच केळी बागांवर मोठा दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या स्थितीत आले असून तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.तालुक्यातील खानापूर पांढरी, देवगाव, धाडी, दहिगाव रेचा, भंडारज, हंतोडा व इतर गावांतील शिवारात केळीची लागवड झाली आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे केळीबागांना मोठा फटका बसत आहे. अनेक उपाययोजना करूनही उष्ण तापमानामुळे केळीचे नुकसान थांबता थांबेनासे झाले आहे. मागील आठवडाभरापासून पारा ४५ अंशाच्यावर आहे. या तापमानात कितीही पाणी दिले तरी केळीची पाने करपत आहेत. रात्रीच्या वेळी या केळीच्या बागांना पाणी देणे गरजेचे असताना विजेच्या लंपडावामुळे केळीला पाणी देणे शक्य होत नाही.अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकरी प्रवीण नेमाडे, नितीन पटेल यांनी पाच ते सहा हजार केळीची झाडे लावली आहेत. परंतु, उन्हाच्या तीव्रतेमुळे ही झाडे अर्ध्यातूनच उन्मळून पडत आहेत. यामुळे उत्पादनक्षमता कमी होत असून लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उष्ण वाºयापासून सरंक्षण व्हावे, जमिनीत ओलावा टिकून राहावा, यासाठी शेडनेट करावे, केळीबागांच्या चारही बाजूला सावरा जातीची झाडे व इतर गवत लावून काही प्रमाणात तरी संरक्षण होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे; परंतु, उन्हाच्या तीव्रतेमुळे या उपाययोजनाही निष्फळ ठरत असल्याचे दिसून येत आहे.दररोज दहा घडांचे नुकसानअंजनगाव सुर्जी तालुक्यात पाणी नसल्याने उत्पादनात घट होत असतानाच दुसरीकडे मात्र वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. उष्ण वातावरण व हवेमुळे केळीबागेतील दररोज पाच ते दहा घड उन्मळून पडत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे दिवसाकाठी अडीच हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 1:30 AM
वाढत्या तापमानाने पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. तद्वतच केळी बागांवर मोठा दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या स्थितीत आले असून तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
ठळक मुद्देअंजनगाव तालुक्यात महत्तम नुकसान : उपाययोजना निकामी