शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

‘एडीफाय’वर बंदची तलवार

By admin | Published: June 18, 2016 12:03 AM

देवी एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित कठोरास्थित 'एडीफाय' शाळेवर बंदची टांगती तलवार आहे.

संचालकाविरुद्ध तक्रार : प्राथमिक शिक्षणाधिकारीकडून चौकशी अमरावती : देवी एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित कठोरास्थित 'एडीफाय' शाळेवर बंदची टांगती तलवार आहे. या शाळेला राज्याच्या शिक्षण विभागाकडून कुठलीही मान्यता मिळाली नसल्याचे प्राथमिक चौकशीदरम्यान स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी एडीफाय शाळेमध्ये जाऊन चौकशी केली. दरम्यान पालक रवी पाटील यांनी या शिक्षण संस्थेच्या संचालकाविरुद्ध नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एडीफाय शाळा अनधिकृत असल्याच्या मुद्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी पानझाडे शुक्रवारी सकाळी कठोरास्थित शाळेमध्ये दाखल झाले. त्यांनी तक्रारकर्ते पालक रवी पाटील यांनाही बोलावून घेतले व तक्रारकर्त्याच्या समोरच एडीफाय व्यवस्थापनाची उलटतपासणी घेतली. चौकशीदरम्यान एडीफायला शिक्षण विभागाने कुठलीही मंजुरी दिली नाही. मात्र, त्यानंतरही पालकांकडून हजारो रुपये उकळत असल्याचे स्पष्ट झाले. शाळा सुरूच झाली नसल्याचा दावा संचालकांकडून करण्यात आला होता. मात्र, पालकांनी रक्कम भरल्याची पावती समोर करताच संचालकांची बोबडी वळली. स्थानिक व्यवस्थापन मंजुरी आणि मान्यतेसंदर्भातील कुठलाही दस्तऐवज शिक्षणाधिकाऱ्यांना दाखवू शकले नाहीत.