शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

बियाणी चौकामागील झुडपांनी घेतला पेट

By admin | Published: April 15, 2017 12:06 AM

बियाणी चौकातील स्टेट बँकेमागील परिसर दुपारच्या सुमारास अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

दोन एकरात पसरली आग : आग विझविण्यासाठी डीसीपींचा धाडसी पुढाकारअमरावती : बियाणी चौकातील स्टेट बँकेमागील परिसर दुपारच्या सुमारास अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. परिसरात साचलेल्या केरकचऱ्याने व वाळलेल्या झडुपांनी पेट घेतल्याने ही आग झपाट्याने पसरली. अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. मात्र, आग रौद्ररूप धारण करीत असल्याचे पाहून पोलीस उपायुक्त शशीकुमार मिना यांनी आगीच्या वेढ्यात शिरून स्वत: आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तब्बल २ एकरांत ही आग पसरली होती. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेमागील परिसरात झाडेझुडुपी वाढली आहेत. या बँकेच्या संरक्षण भिंतीजवळ अनेक लोक कचरा गोळा करतात. परिसरात आगी लागल्याच्या घटना बहुधा घडल्यात. शुक्रवारी दुपारी १२ वाजता या कचऱ्याने अचानक पेट घेतला. काही वेळातच आग पसरू लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, तासाभरानंतरही आग आटोक्यात येईना. वाऱ्यामुळे आगीचा विस्तार वाढतच होता. याच परिसरात काही अंतरावर महापौर बंगला व शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. आग त्यादिशेने सरकत असल्याने पोलीस यंत्रणाही सतर्क झाली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी तातडीने याची दखल घेत काही कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. आग निवासस्थानांपर्यंत पोहोचल्यास तेथील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्यात. दरम्यान पोलीस उपायुक्त मीना यांनी आगीचा वाढता प्रकोप लक्षात घेता तातडीने अग्निशमन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. स्वत: आगीच्या वेढ्यात शिरून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. डीसीपी शशीकुमार मीना यांच्या या कर्तव्यतत्परतेची परिसरात चर्चा होती. (प्रतिनिधी)पोलीस, अग्निशमन विभागाची मोलाची कामगिरीपोलीस यंत्रणेतील सहायक पोलीस आयुक्त पी.डी.डोंगरदिवे, गुन्हे शाखेचे प्रमेश आत्राम यांच्यासह मोठा पोलीस ताफा आग नियंत्रणासाठी एकत्र आला होता. डोंगरदिवे यांनी झुडुंपांमध्ये प्रवेश करून अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांना मदत केली. अग्निशमनचे प्रभारी अधीक्षक भरतसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात फायरमन प्रेमानंद सोनकांबळे, विलास गोमेकर, सैय्यद अनवर, राजेश गजभे, अतुल कपल, राजेश अलोडे, निखील भाटे, ड्युटी इनचार्ज मच्छिंद्र यादव, चालक राजेंद्र लोणारे, सोहेब खान, राजेश अलोडे यांनी तब्बल दीड तासांत सहा पाण्याच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले.