शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

बापरे, १८० दिवसांत ११७१५ जणांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:11 AM

प्रदीप भाकरे अमरावती : मोकाट कुत्र्यांमुळे शहरात वावरताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहराबरोबरच ज‌िल्ह्यात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून, ...

प्रदीप भाकरे

अमरावती : मोकाट कुत्र्यांमुळे शहरात वावरताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहराबरोबरच ज‌िल्ह्यात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून, लहान मुलांपासून ते वाहनचालक, प्राणी जखमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तब्बल ११ हजार ७१५ व्यक्तींना कुत्र्यांनी चावा घेतला. त्यात अमरावती शहरातील ७ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा समावेश आहे. दोन महिन्यांपूर्वी दर्यापूर शहरात एका भटक्या कुत्र्याने तब्बल १३ जणांना चावा घेतला होता, तर ४ जुलै रोजी सकाळी कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका हरणाचा मृत्यू झाला होता, तर दोन गंभीर जखमी झाले होते. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून श्वान निर्बीजीकरणात हाराकिरी होत असल्याने मोकाट श्वानांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. शहरातून रात्री जाताना कुत्रे मागे येऊन पाठलाग करतात. त्यामुळे वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागते. शहरातील झोपडपट्टी भागात मोकाट श्वानांचा मुक्त संचार असला, तरी अन्य भागातील रस्त्यांवर देखील मोकाट श्वानांच्या झुंडीच्या झुंडी आढळून येतात. एकट्या इर्विन रुग्णालयामध्ये सहा महिन्यांत श्वानदंशाच्या तब्बल ७ हजार २९७ केसेसची नोंद घेण्यात आली. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या प्रशासन याबाबत कोणतीही उपायोजना करत नसल्यामुळे नागरिकांनीच सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. इर्विन रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध असून, कुत्र्याने चावा घेतल्यास ही लस तातडीने टोचून घेणे आवश्यक आहे.

बॉक्स १

मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांपासून धोका अधिक

शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांपासून धोका अधिक आहे. झुंडीने राहणाऱ्या कुत्र्यांत पिसाळण्याची शक्यता अधिक असते. अस्वच्छ खाणे, अस्वच्छ वातावरणासह काही अन्य कारणांमुळे रेबीजचे विषाणू कुत्र्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात. हे विषाणू त्याच्या लाळेत असतात. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर लाळेचा संसर्ग इतरांना झाल्यास रेबीजची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

बॉक्स २

येथे कुत्र्यांचा वावर

कचरा कुंडीसह मटण, चिकनची दुकाने, चायनीजची दुकाने, कत्तलखाने व कंपोस्ट डेपो परिसरात कुत्र्यांच्या झुंडी कायम आहेत. चायनीजच्या गाड्यांवरील कचरा कोंडाळा किंवा अनेकदा गटारीच्या कडेला टाकतात. त्यामुळे अशा परिसरात कुत्र्यांचा वावर वाढला आहे.

लक्षणे

रेबीज झालेल्या रुग्णाला साधारणपणे ताप आणि तापाची लक्षणे, मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची भीती वाटते. त्याचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो व तो बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो.

उपचार -

कुत्रे चावल्याने जखम झाल्यावर लवकर ती स्वच्छ करावी, त्यामुळे रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीजवर ॲन्टीरेबीज व्हॅक्स लस उपलब्ध आहे. रुग्णाने रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस घेतले पाहिजे. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात, चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत.

कुत्रे चावल्यावर उपाय -

जखम स्वच्छ साबणाने धुवून काढावी, जंतुनाशक लावावे

जास्त रक्तस्त्राव होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत

हे टाळा -

जखमेवर चुना, हळद, माती, तंबाखू, चहा पावडर, लिंबू असे पदार्थ लावू नये

जखमेला पट्टी बांधू नये, टाके घालू नयेत

जानेवारी ते जूनपर्यंत झालेली नोंद

दवाखाना : श्वानदंश केसेस

इर्विन : ७२९७

ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी : ४०३

ग्रामीण रुग्णालय भातकुली: १७४

ग्रामीण रुग्णालय, चांदूर बाजार : २८७

ग्रामीण रुग्णालय, चांदूर रेल्वे : ३२१

ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा : ३२

ग्रामीण रुग्णालय, चुरणी: ३९

ग्रामीण रुग्णालय, धामणगाव : १००

ग्रामीण रुग्णालय, नांदगाव : ३००

ग्रामीण रुग्णालय, तिवसा : २१३

ग्रामीण रुग्णालय, वरूड : ४३२

उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर: ७८०

उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर : ३४४

उपजिल्हा रुग्णालय, धारणी ५९५

उपजिल्हा रुग्णालय मोर्शी : ३९८