कारवाई शून्य : तिसऱ्यांदा येऊनही कारवाईचे आदेश नाही. संदीप मानकर अमरावती अन्न व नागरिक सुरक्ष़ा व अन्न पुरवठा मंत्री ना. गिरीश बापटांचे येथील एफडीएच्या अधिकाऱ्यांना अभय का, हा विषय आता चर्चीला जात आहे. अमरावतीकरांचे आरोग्य धोकयात असताना ना. बापट तिसऱ्यांदा अमरावती मध्ये येऊनही कुठलेही कारवार्इंचे आदेश दिले नाही. त्यामुळे त्याचे अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना अभय का, असा प्रश्न चर्चिला जात आहे. अंबानगरीत आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून घराघरांत मृत्युची विक्री सुरू आहे. या संदर्भात 'लोकमत'ने अनेकदा स्टिंग करून ही बाब लोकदरबारात मांडली. त्यासंदर्भात बापटांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु तपास करू. यानंतरच कारवाई करण्यात येईल, अशी थातूर-माथूर भूमिका ना. बापटांनी घेतली आहे. संपूर्ण अंबानगरीच्या लोकांचे आरोग्य धोक्यात असताना एफडीए गप्प का, असा प्रश्नही निर्माण होत आहे. बापटांना गुटख्याच्या मुद्यावर छेडले असता हे आपल्या विभागाशी संबंधित असल्यामुळे सावध भूमिका घेतली. ते म्हणाले, राज्यात गुटखा बंदी आहे. पण इतर राज्यांतून गुटखा हा महाराष्ट्रात येतो. आम्ही एफडीएला आयपीसीची कलम ३२८ लावण्याची परवानगी न्यायालयाला मागितली. पण ते उच्च न्यायालयाने नाकारली आहे. यासंदर्भात शासानाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जर हे कलम लावण्याची परवानगी मिळाली तर कायद्यात कडक तरतूद होणार आहे. त्यामुळे अन्न विभागाला गुटखा रोखण्यास मदत होईल. तोपर्यंत कारवाईही होते. पण आमचे हात बांधले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे जरी खरे असले तरी अमरावतीच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना एफडीएने कुठलीही कारवाई न करणे व अन्न मंत्री ना. गिरीश बापट व एफडीए आयुक्त हर्षदीप कांबळे यांचे अधिकाऱ्यांना अभय असणे हे सामाजिक बांधिलकीला न पटणारी बाब आहे. जर आंबे व इतर फळांमधून कार्बाईडसारखे घातक रसायनिक द्रव्य विकले जात असतील तर अशा फळ विक्रेत्यांवर तातडीने कारवाई व्हायला हवी. हे एफडीएची त्या विभागाच्या आयुक्तांची व संबंधित मंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे. या जबाबदारीतून जर ते आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असतील तर नागरिकांनी त्यांना का माफ करायचे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे. आंब्यामधून विकले जाते विषविदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र बापट हे होय. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्बाईडचा वापर करून आंब्यामधून विष विकले जात असताना ना.बापट अंबानगरीत महिनाभरात तीन वेळा आले आहेत. आंबे कार्बाईडने पिकवून अंबानगरीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे त्यांना पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले. पण बापटांना यासंदर्भात कुठलीही भूमिका घेतली नाही. आपण या विभागाचे मंत्री असताना आपल्याला अमरावतीकरांच्या आरोग्याशी काही एक घेणेदेणे नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले. त्यामुळे बापटांचे एफडीएच्या अधिकाऱ्यांना अभय का, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती.
बापटांचे अधिकाऱ्यांना अभय का ?
By admin | Published: June 13, 2016 1:29 AM