नागरिक त्रस्त : पोलिसांचे दुर्लक्ष (रियालिटी)
अमरावती : दुपारी ४ नंतर कुणीही दुकाने, प्रतिष्ठाने, बीअर बार बंद ठेवण्याचे आदेश असतानाही काही बारवर थेट दुपारी ४ नंतरही दारूविक्री होत असल्याचे वास्तव आहे. काही बारवर बाहेरून फाटक बंद राहते, तर छुप्या मार्गाने दारूविक्री होत असल्याचे निदर्शनास आले. रात्री उशिरापर्यंत हा प्रकार सुरू राहत असल्याने कोरोनात या भागातील नागरिकसुद्धा त्रस्त झाले आहे. पोलिसांनी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ‘लोकमत’ने रविवार दुपारी ४ ते ७ वाजता दरम्यान रियालिटी चेक केले असता, दारूविक्री होत असल्याचे पुढे आले.
गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील जलसा बारचे बाहेरून दार बंद होते. मात्र, एका गल्लीतून या बाराचा दरवाजा उघडा राहत असल्याचे नेहमीप्रमाणे आढळले. या ठिकाणी आतून दारूविक्री होते. रात्री उशिरापर्यंत येथे मद्यपींचा वावर असतोे. त्यामुळे या भागातील नागरिकसुद्धा त्रस्त झाले आहेत.
शहर कोतवाली ठाणे हद्दीतील जयस्तंभ चौक स्थित हॉटेल रेस्टॉरेंट अँड बारचा दरवाजा दुपारी ५ वाजताच्या सुमारस उघडा होता. अशीच परिस्थिती राजापेठ हद्दीतील हॉटेल राज प्लाझा येथेही आढळली. दरवाजा उघडा होता. काही लोकांचा वावर होता. शनिवारी-रविवारी वीकेंड लॉकडाऊन असतानाही रविवारी जर अशा प्रकारे बार दुपारी ४ नंतरही सुरू राहत असतील व दारूची सर्रास विक्री होत असेल, तर हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लघंन नव्हे का? दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असलेल्या बार व हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे नोंदविले, हे विशेष!
कोट
आम्ही कॉलनीतील नागरिक जलसा बारमुळे त्रस्त आहोत. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी दारूविक्री होत असल्याने येथे मद्यपींचा वावर असतो. येथेच पार्सल विकत घेऊन दारू ढोसली जाते.
एक नागरिक
कोट
अर्जुननगर
अर्जननगरनजीक नागपूर मार्गावरच जलसा बार आहे. आधी मद्यपींचा वावर समोरून होता. मात्र, कोरोनामुळे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. नागरिकांचा वावर कॉलनीतील गल्लीतून असतो. येथून दोन किमी अंतरावर गाडगेनगर ठाणे आहे.
जयस्तंभ चौक
येथूनच हाकेच्या अंतरावरच सिटी कोतवाली ठाणे आहे. मुख्य मार्केट आहे. नियमांचे उल्लघंन केल्यास साधारण नागरिकांवर पोलीस कारवाईचा बडगा उगारतात. मात्र, ४ नंतरही येथील बारचा दरवाजा उघडा ठेवला जात असला तरी कारवाई केली जात नाही.
राजापेठ
राजापेठच्या रेल्वे अंडरपासच्या पुढेच कंवरनगरकडे जाणाऱ्या मार्गावर बार आहे. दुपारी ४ नंतरसुद्धा या बारचे प्रवेशद्वार उघडे होते. मात्र, कारवाई करण्याची तजवीज पोलीस करीत नाहीत.
सीपींचा कोट आहे.