आॅनलाईन लोकमतअमरावती : शेगाव नाका येथे शनिवारी मध्यरात्रीतील नाकाबंदीदरम्यान एका भरधाव दुचाकीस्वाराने बॅरिकेड पाडून वाहतूक पोलिसांच्या अंगावर दुचाकी नेली. या अपघातात वाहतूक पोलीस मनोज बोंडे यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने शहरात नाकाबंदी लावण्यात येत असून शनिवारी मध्यरात्री गाडगेनगर हद्दीतील शेगाव नाका परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. त्या मार्गाने ये-जा करणाºया वाहनांची तपासणी करीत असताना अचानक मद्यधुंद अवस्थेत दुचाकीस्वार भरधाव बॅरिकेडवर आदळला. सोबत बॅरिकेडमागे उभे असलेले मनोज बोंडे यांच्या पायाला दुचाकी धडकली. तत्काळ बोंडे यांना बाजुला करून पोलिसांनी चव्हाण नामक दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याला गाडगेनगर ठाण्यात नेले. चव्हाण हा मूळचा दिग्रस येथील रहिवासी आहे. हल्ली तो गाडगेनगर परिसरात राहतो. तो अमरावतीमधील एका महाविद्यालयात विज्ञान शाखेला शिकत आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली.
बॅरिकेड पाडून वाहतूक पोलिसावर धडकली दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 10:52 PM
शेगाव नाका येथे शनिवारी मध्यरात्रीतील नाकाबंदीदरम्यान एका भरधाव दुचाकीस्वाराने बॅरिकेड पाडून वाहतूक पोलिसांच्या अंगावर दुचाकी नेली.
ठळक मुद्देनाकाबंदीदरम्यान घटना : पोलिसाचा पाय फ्रॅक्चर