मनीष तसरे लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शहरात किरकोळ कारणातून वाद, हाणामारीच्या घटना एकीकडे वाढत असताना दुसरीकडे रहदारीच्या रस्त्यावर खुलेआम झिंगणाऱ्या मद्यपींचेही प्रमाण वाढू लागले आहे.
रस्त्यावर किंवा मोकळ्या भूखंडावर निर्जन भागात रात्रीच्यावेळी बसणाऱ्या मद्यधुंदांना आवरणार कोण? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अनेक मद्यपी सकाळपासून दारू पिण्यासाठी येतात. पाण्याची बाटली, ग्लास विक्रीचे दुकान प्रत्येकच चौकात असल्याने मद्यपी याच ठिकाणी खुलेआम दारू पितात.
शहरातील अनेक चौकात रस्त्यावर दारू पिण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. याकडे गस्तीवर असलेले पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून डोळेझाक का केली जात आहे. यापूर्वीही दारू पिण्यासाठी उघड्यावर एकत्र बसलेल्या टोळक्यांमध्ये वाद होऊन खून झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. रस्त्यांवर बार भरविणाऱ्यांना आणण्यासाठी वठणीवर पोलिसांना दारूड्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारावा लागणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.
या ठिकाणी रस्त्यावरच झिंगाट जुना बायपास मार्ग दस्तूर नगर चौकाच्या पुढे बडनेरा मार्गावर रस्त्यावरच काही अंतरावर मद्याचे दुकान असल्याने येथे अगदी रस्त्यावरच बाहेर दररोज अनेक मद्यपी या चौकात सकाळपासून दारू पितात.
सूतगिरणी मैदानावर युवा व्हाउचर साप्ताहिक पारितोषिक TEC APPLY रोज संध्याकाळी या ठिकाणी खुल्या जागेत अंधाराचा फायदा घेत ओपन बार थाटतात. येथे अनेकदा वादविवाद होतात. ज्यामुळे स्थानिक वातावरण अस्वस्थ होते. मद्यपींच्या दारू पिण्याच्या भानगडीमुळे इथे येणाऱ्या व्यक्तींना मानसिक त्रास होतो.
शेगाव नाका चौक या चौकात महिला वसतिगृह, शाळा, महाविद्यालय आहे. अनेक मद्यपी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भिंतीला लागून तसेच अनेक जण पोलिस स्टेशनच्या भिंतीला लागून दारूच्या बाटल्या रिचवतात.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न शहरातील काही चौकात महिला वसतिगृह, शाळा, महाविद्यालय आहे. अनेक मद्यपी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भिंतीला लागून तसेच अनेक जण पोलिस स्टेशनच्या भिंतीला लागून दारूच्या बाटल्या रिचवतात.
वाहनचालक, पादचाऱ्यांना त्रास अनेक मद्यपी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर दारू पितात. त्यामुळे पादचारी, वाहनचालक यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
पोलिसांची मद्यपीवर कारवाई "रस्त्यावर मद्यपी दारू पित असेल तर त्यांच्यावर प्रत्येक पोलिस स्टेशन निहाय कारवाई केल्या जात आहे. रात्रीच्या वेळी शहरातील चौकात तसेच निर्जन स्थळी लोक एकत्रीत येवून दारूपार्च्छा करत असेल तर पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात."- नवीनचंद्र रेड्डी, शहर पोलिस आयुक्त