शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

सावधान! अपघाताचा बनाव करून लुटणारे सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 11:34 PM

तुमच्या वाहनासमोर येऊन कोसळल्यासारखे करणे आणि मोबाइल फुटल्याचा बनाव करून मोबदल्याचा तगादा लावणे, अशा पद्धतीने गंडविणाऱ्या दोन टवाळखोरांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोतवाली पोलिसांनी मध्यतंरी दोन आरोपींना ताब्यात घेतले होते, मात्र, त्यानंतरही काही व्यक्तींबाबत असा प्रसंग घडल्याची माहिती पुढे आली आहे. अशा टोळीला न घाबरता पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तुमच्या वाहनासमोर येऊन कोसळल्यासारखे करणे आणि मोबाइल फुटल्याचा बनाव करून मोबदल्याचा तगादा लावणे, अशा पद्धतीने गंडविणाऱ्या दोन टवाळखोरांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोतवाली पोलिसांनी मध्यतंरी दोन आरोपींना ताब्यात घेतले होते, मात्र, त्यानंतरही काही व्यक्तींबाबत असा प्रसंग घडल्याची माहिती पुढे आली आहे. अशा टोळीला न घाबरता पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.महिनाभरापूर्वी कोतवाली हद्दीतील रेल्वे स्थानक चौकात एका व्यक्तीच्या दुचाकीसमोर दोन तरुण अचानक आले. कोसळल्यासारखे करून त्यांनी मोबाइल फुटल्याचा आव आणला. भरपाईच्या मागणीसाठी ते दुचाकीस्वाराच्या मागेच लागले. त्यांना मोबाइल दुरुस्तीच्या दुकानात नेले. पाच हजारांचा खर्च सांगितला. मात्र, त्या दुचाकीस्वाराजवळ तेवढे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी नकार दिला. मात्र, त्या भामट्यांनी दुचाकीस्वाराकडे तगादा लावून धमकाविणे सुरू केले. वाद वाढत असल्याचे पाहून दुचाकीस्वाराने या घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना दिली. पोलिसांनी पाचारण करून दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले.यांच्यासोबत घडला प्रसंगदहा-बारा दिवसांपूर्वी शहरातील रहिवासी धीरज बारबुध्दे यांना त्यांचे शेजारी राजाभाऊ भुयार यांनी घाबरलेल्या आवाजात फोन केला. जुना कॉटन मार्केटसमोर त्यांच्यामुळे अपघात झाल्याचे सांगितले. विशिष्ट समुदायातील दोन तरुण अपघातामुळे मोबाइल फुटल्याचे सांगत मोबदला मागत आणि धमकावत असल्याचे त्यांनी सांगितले. धीरज बारबुद्धे यांनी त्यांना पोलीस तक्रारीचा सल्ला दिला. मात्र, भुयार यांचे धाडस झाले नाही. ते त्या दोघांना घेऊन बारबुद्धे यांच्या घरी पोहोचले. अपघातात फुटलेला मोबाइल फेकून दिल्याचे ते दोघे सांगत होते. भुयार यांनी तडजोड करून सहा हजार रुपये दिले. भानगड निपटल्याचे समाधान भुयार यांना झाले. मात्र, ते भामटे होते, याची कल्पनाही बारबुद्धे व भुयार यांना नव्हती.दुसऱ्यांदा तसाच प्रसंगपुसदा येथील एक कास्तकार वसंतराव तभाने अतिशय घाबरलेल्या स्थितित मार्केटमधे आले. त्यांनी त्यांचा मित्र रूपेशला जवळ बोलावले व अपघात झाल्याचे सांगितले. ते अपघातग्रस्त दोन तरुणांना सोबत घेऊन आले होते. अपघातात एकाकडील मोबाइल फुटला; त्यांना चार हजार द्यायचे आहे. तुला गावात परत करतो, असे त्यांनी रूपेशला म्हटले. त्यावेळी धीरज बारबुद्धे दुरूनच त्या दोघांना पाहत होते. त्या दोघांना कुठे पाहिले असेल, हे आठवत असतानाच, हेच दोघे भुयार यांच्यासोबत घरी आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे धीरज बारबुद्धे यांनी रूपेशला बोलावून आपबीती कथन केली तसेच त्या भामट्यांना गोष्टीत गुंतवून ठेवण्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान त्यांनी गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे धीरज बारबुद्धे यांनी भुयार यांच्याशी संपर्क करून पोलिसांना सोबत घेऊन येण्यास सांगितले. यादरम्यान त्या भामट्यांना संशय आला आणि त्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. हा सर्व प्रकार बाजार समितीच्या सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती आहे.व्हॉट्सअ‍ॅपवर जनजागृतीमाझ्यासोबत दोनवेळा असा प्रसंग घडला आहे. बाजार समितीतील ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देणार आहे. पण, इतवारा बाजार ते नवीन काँटन मार्केट दरम्यान कुणासोबतही असा प्रकार घडल्यास त्यांनी दक्षता घ्यावी व लगेच पोलिसांसोबत संपर्क करावा, अशी माहिती धीरज बारबुद्धे यांनी व्हॉट्सअ‍ॅप समूहावर व्हायरल केली.येथे करावा संपर्कअपघात घडवून मोबाइल फुटल्याचा बनाव करणारे दोन तरुण आढळल्यास, त्यांच्याविषयीची माहिती शहर पोलिसांचा १०० किंवा ०७२१-२५५१०० तसेच ग्रामीण पोलीस दलाच्या ०७२१-२६६५०४१ या क्रमांकावर द्यावी.