शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

सावधान! मिठाई खा; पण निकष पारखून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 9:29 PM

दिवाळीला बाजारात मिळणाऱ्या विविध रंगबिरंगी मिठाईला विशेष मागणी असते. मिठाई खा, पण जरा जपून, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देरासायनिक पदार्थांचा वापर होण्याची शक्यता : दिवाळीच्या सणासुदीला बळावतील विकार

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीला बाजारात मिळणाऱ्या विविध रंगबिरंगी मिठाईला विशेष मागणी असते. मिठाई खा, पण जरा जपून, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.सणासुदीला मिठाईमध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्न प्रशासन विभागाने हॉटेलमधील अशा पकारच्या मिठाईची तपासणी केल्यास भेसळ संदर्भातील सत्य बाहेर निघेल. मिठाईसाठी लागणारा खवा हा अमरावती जिल्हयात कमी पमाणात तयार होतो. कारण मिठार्इंची मागणी जास्त व दुधाचे संकलन त्या तुलनेत कमी असल्याने बाहेरील जिल्ह्यातून दूध आणावे लागते.चवदार लागणाºया मिठाईमध्ये घातक असे रसायनिक द्रव्य वापरले जात असल्याने ते शरीरासाठी अत्यंत घातक ठरते. मिठाई लहान मुलेसुद्धा आवडीने सेवन करतात. त्या कारणाने त्यांच्या आरोग्याला भेसळयुक्त मिठाई जास्त घातक व हानिकारक ठरू शकते.जिल्ह्यात एकूण १२६ परवानाधारक हॉटेल तसेच २६२ रेस्टॉरंट-हॉटेल आहेत. ५६६ लहान-मोठे नोंदणीकृत हॉटेल जिल्ह्यात कार्यरत आहेत. शेकडो हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या मिठाई विक्री होत आहेत. त्या सर्वच्या सर्व मिठाईच्या गुणवत्तेची पारख झालेली असण्याची खात्री बाळगता येत नाही.कसा तयार होतो खवा व भेसळ?एका लिटर दुधामधून २०० ग्रॅम खवा तयार होतो. म्हणजे एक किलो खव्यासाठी पाच लिटर दुधाची आवश्यकता असते. एका हॉटेलमध्ये या दिवसांची सरासरी २५ किलो मिठाई एका दिवसात विक्री होते. म्हणजे सणाला दिवसाकाठी १५००० किलो मिठाईची जिल्ह्यात विक्री करण्यात येते. ही मिठाई तयार करण्यासाठी सरासरी ७५ हजार लिटर दुधाची गरज भासते. मात्र, अमरावती व यवतमाळ जिल्हा दूग्ध संघाकडून साडेचार हजार लीटर दुधाची आवक नोंदविली जात आहे, तर मदर डेअरी, यशोदा व खासगी दूग्ध पुरवठाच्या माध्यमातून २६ हजार लिटर दूध संकलित होत आहे व ते नागरिक व हॉटेल चालकांपर्यंत पोहचविले जात आहे. नोंदणी न केलेल्या खासगी किरकोळ दुग्ध उत्पादकांकडूनही हजारो लिटर दूध बाजारात येते. तरीही जेवढी खव्याची मागणी आहे, तेवढा खवा तयार करण्याइतपत दुधाची पूर्तता अमरावती जिल्ह्यातून होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. त्या कारणाने खवा बाहेरून येतो व यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशी ओळखली जाईल भेसळमिठाई म्हणून आपण गोड विष तर खात नाही ना, याची खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे. विक्रीसाठी ठेवलेल्या अनेक पदार्थांवर लेबल किंवा इतर गोष्टी या नियमानुसार दिसल्या नाहीत, तर यामध्ये भेसळयुक्त पदार्थ असण्याची शक्यता असते. प्रथम खव्याच्या जवळून सुगंध घ्यावा. खव्यात चिकटपणा नसल्यास त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. खव्याचे तुकडे घेऊन त्यावर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड टाका. त्याला जांभळा रंग आल्यास त्यात मेटॅनिल यलो रंगाची भेसळ असल्याची समजावे. खव्याचे पदार्थ २४ तासांत, तर बंगाली मिठाई आठ ते दहा तासांत संपविण्याची सूचना मिठाईच्या बॉक्सवर नमूद आहे काय, हे पहावे.