एक जिल्हा, एक उत्पादन योजना; प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान
अमरावती : केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना वैयक्तिक शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, सहकारी उत्पादक संस्था यांना कृषी प्रक्रिया उद्योगाकरिता अर्थसहाय्य देण्यासाठी २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षाच्या कालावधीत राबविली जाणार आहे. यात जिल्ह्यातील २१७ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
वैयक्तिक तसेच गट शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी उत्पादक संस्थाना सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना सक्षमीकरणासाठी बँक कर्जाशी निगडित प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान खर्चाच्या ३५ टक्के बॅडिंग व बाजारपेठ सुविधांसाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अनुदान देय आहे. योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत प्रस्ताव राज्यस्तरीय समितीच्या मान्यतेने मंजूर केले जाणार आहेत. ० लाखांपेक्षा अधिक रकमेचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्येतेसाठी पाठविले जाणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या वैयक्तिक, स्वयंसय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी उत्पादक संस्था यांच्या बाबतीत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना दर्जा वाढ, स्तरवृध्दी, विस्तारीकरण, आधुनिकरण भांडविली गुंतवणुकीसाठी सहाय्याकरिता संत्रा पिकावर आधारित असेल, तर त्यांनादेखील या योजनेंतर्गत सहाय्य केले जाणार आहे. नवीन उद्योगाच्या संदर्भात जे उद्योग वैयक्तीरीत्या, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी उत्पादक संंस्था या संत्रा पिकावर आधारीत उद्योग करीत असेल तरच त्यांना सहाय्य केले जाणार आहे. सामाईक, पायाभूत सुविधा तसेच उत्पादनाचे ब्रॅडींग व विपणन यासाठीचे सहाय्य संंत्रा पिकावर आधारित उद्योगांनाच केले जातील. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेंतर्गत बीजभांवल या योजनेंतर्गत स्वयंमसहाय्यता गटातील प्रत्येक सभासदास ४० हजार रुपये बीजभांडवल व लहान उपकरणे खरेदीसाठी सहाय्य केले जातील.
बॉक्स
कोणाला घेता येणार लाभ?
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत वैयक्तिक शेतकरी, स्वयंसय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी उत्पादक संस्था आदी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
बॉक्स
ऑनलाईन अर्ज
वरील योजनेतर्गत लाभार्थ्यांना एचटीटीपी://पीएमएफएमई.एमओएफपीआय.जीओव्ही.इन या ऑनलाईं प्रणालीव्दारे तर स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी उत्पादक संस्थांनी आफलाईन पध्दतीव्दारे अर्ज सादर करावयाचे आहेत. याकरिता तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशीसुध्दा संपर्क करावा लागणार आहे.
बॉक्स
तालुकानिहाय उद्दिष्ट
अमरावती -१६
भातकुली -०९
चांदूर रेल्वे-१६
धामनगांव रेल्वे -१६
नांदगाव खंडे.-१६
अचलपूर-१६
अंजनगाव सुजी-१६
दर्यापूर -१०
धारणी-१०
चिखलदरा -११
मोर्शी-२२
चांदूर बाजार-२२
तिवसा-१५
कोट
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेंतर्गत जिल्ह्याला १४ तालुक्याकरिता २१७ एवढे उद्दिष्ट आहे. याकरिता शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार कृषी विभागामार्फत योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.
- अनिल खर्चान,
प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
अमरावती