सुमारे दोन लाख रुपयाचा दंड वसूल, गावोगावी पथके तैनात
अमरावती; जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, गत एप्रिल ते २ मेपर्यंत १४ तालुक्यातील ग्रामपंचायतींनी २ लाख ३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती केली जात आहे, तरीही गावोगावी नागरिक विना मास्क फिरताना दिसत आहेत. त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर ग्रामपंचायतीमार्फत कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी गावस्तरावर पथके नेमण्यात आली आहेत. तसेच पंचायत समितीमार्फत भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. भरारी पथक अचानक गावांना भेटी देऊन विना मास्क फिरणाऱ्या, दुकाने, आस्थापनाकडून नियमाचे उल्लघंन करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारत आहे . आतापर्यत १४ तालुक्यात २ लाखावर दंडाची वसुली करण्यात आली आहे. याशिवाय गर्दी करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
कोट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी विना मास्क फिरणाऱ्यावर ग्रामपंचायत व भरारी पथकातर्फे कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी ग्रामपंचायत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे
दिलीप मानकर
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
पंचायत