शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

लोकसहभागातून मध्यवर्ती चौकांचे सौंदर्यीकरण!

By admin | Published: April 12, 2016 12:25 AM

स्मार्ट सिटी नामांकन स्पर्धेत अव्वलस्थानी असलेल्या अमरावती शहरातील रस्ते दुभाजक आणि चौकांचे लोकसहभागातून सौंदर्यीकरण होणार आहे.

महापालिकेचा पुढाकार : स्मार्ट सिटीकडे पाऊल, सहकार्याचे आवाहन अमरावती : स्मार्ट सिटी नामांकन स्पर्धेत अव्वलस्थानी असलेल्या अमरावती शहरातील रस्ते दुभाजक आणि चौकांचे लोकसहभागातून सौंदर्यीकरण होणार आहे. शहराच्या सौंदर्याला चार चांद लावण्यासाठी इच्छुक असलेल्या अमरावतीकरांसाठी महापालिका आयुक्तांनी आवाहन करून सकारात्मक पाऊल अंगिकारले आहे. शहराला ऐतिहासिक व राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. त्यातच सद्यस्थितीत देशपातळीवर शहर स्मार्ट सिटी नामांकनाच्या स्पर्धेत आहे. शहरास अत्यंत सुंदर बनविण्यासाठी व जतन करण्यासाठी अमरावतीकरांचे सहकार्य आणि सहभाग लाभावा, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली आहे. शहरातील विविध चौक व रस्ता दुभाजकाचे सौंदर्यीकरणासाठी कंत्राटदार, अभियंता स्थापत्य विशारद, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, नामवंत व्यक्तींनी समोर यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पाचीह झोनमधील निवडक चौकांचे व रस्ता दुभाजकांचे संकल्पचित्र बनवून त्याप्रमाणे बांधकाम करणे, त्यासाठी लागणारा खर्च स्वत: करणे, या अटीशर्तींवर हा लोकसहभाग अवलंबून राहणार आहे. स्मार्ट सिटी नामांकन स्पर्धेत दुसऱ्या टप्प्यातील संधीसाठी ‘अमरावती महापालिका’ ‘हॉट फेव्हरेट’ आहे. मात्र दुसरीकडे महापालिकेकडे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असल्याने आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. आर्थिक अरिष्टांमुळे विकासकामातीलअडसर पाहता चौक व दुभाजकांच्या सौंदर्यीकरणासाठी महापालिका यंत्रणेने शहरात विविध घटकांना समोर येण्याचे आवाहन केले आहे. आयुक्तांच्या या आवाहनाला शहरवासी कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.या चौकांचे सौंदर्यीकरण अपेक्षितसरोज चौक, शामनगर, कल्याणनगर, स्वामी विवेकानंद चौक, मोतीनगर, रुख्मिणीनगर, यशोदानगर, दस्तुरनगर, छत्रीतलाव चौक, हमालपुरा, राजेंद्र कॉलनी, प्रशांतनगर, वडाळी गार्डन चौक, फरशी स्टॉप, लक्ष्मीनारायणनगर, गणेशनगर, चवरे नगर चौक, शेगाव चौक, रहाटगाव चौक, विद्यापीठ चौक, बियाणी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, पंचवटी, कठोरा नाका, भुतेश्वर चौक, पुंडलिकबाबा चौक, मालटेकडी चौक, शिवाजी मार्केट चौक, आदर्श हॉटेल चौक, चांदणी चौक, तहसील चौक, प्रभात चौक, बापट चौक, पठाण चौक, लालखडी चौक, इदगाहगेट, अंबाविहार, पार्वतीनगर, छाया कॉलनी चौक, महेश्वर मंदिर चौक, अंबागेट आदी चौकांचे सौंदर्यीकरण अपेक्षित आहे.