रुख्मिणीनगरातील घटना : पोलिसांत धावअमरावती : रूख्मिणीनगरातील करण बिअर शॉपीच्या संचालकाने एका तरूणाला रविवारी शिवीगाळ करून धमक्या दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकारासंदर्भात अंकुश विजय डहाके याने दारू दुकान संचालक अरुण जयस्वालविरूद्ध फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. राज्य महामार्गावरील दारु विक्रीस बंदी घालण्यात आल्यानंतर अनेक मद्यपींनी शहरातील अंतर्गत दारु विक्री केंद्रांवर गर्दी केली आहे. त्यामुळे बहुतांश दुकानांमध्ये पाय ठेवण्यास जागा नाही. असाच प्रकार रुख्मिणी नगरातील बिअर शॉपीवर दिसून येत असून याठिकाणी मद्य खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. मद्यपींचा वावर वाढल्यामुळे त्यापरिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची ओरडही आता सुरु झाली आहे. दारु दुकानात येणारे ग्राहक त्याच परिसरात बसून मद्यप्राशन करतात. पाण्याचे रिकामे पाऊच आणि प्लास्टिकचे ग्लास परिसरातच टाकले जातात. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याची नागरिकांची तक्रार आहे. माजी नगरसेवकाच्या मालकीचा बारअमरावती : रविवारी अंकुश डहाके यांच्यासह काही नागरिक दारुविक्री दुकानाच्या संचालकांकडे तक्रार करण्यास गेले होते. तेथील व्यवस्थापकाला उपरोक्त प्रकार सांगत असतानाच दुकानाचे संचालक अरुण जयस्वाल त्याठिकाणी आले. नागरिकांनी मद्यपींचा हा गोंधळ त्यांच्याही निदर्शनास आणून दिला. मात्र, त्यांनी काहीही ऐकून न घेता अरेरावी करीत शिवीगाळ करून व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे अंकुश डहाके यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात अंकुशसह काही नागरिकांनी फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली असून पुढील चौकशी पोलिसांनी आरंभली आहे.
बिअर शॉपी संचालकाकडून तरुणाला शिवीगाळ
By admin | Published: April 10, 2017 12:18 AM