शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

भीक मांगो आंदोलनाची दिंडी पोहोचली अमरावतीत

By admin | Published: December 06, 2015 12:15 AM

विनाअनुदानित शाळा व वर्गतुकड्यांना अनुदान मिळण्यासाठी शेगाव ते नागपूर पायी दिंडी काढून भीक मांगो आंदोलन करण्यात येत आहे.

श्रीकांत देशपांडेंचे नेतृत्व : १० हजार शिक्षक विधानभवनावर धडकणारअमरावती/बडनेरा : विनाअनुदानित शाळा व वर्गतुकड्यांना अनुदान मिळण्यासाठी शेगाव ते नागपूर पायी दिंडी काढून भीक मांगो आंदोलन करण्यात येत आहे. ही दिंडी शनिवार ५ डिसेंबर रोजी अमरावतीत आली. संपूर्ण महाराष्ट्रातून १० हजार शिक्षक हिवाळी अधिवेशनावर यातूून धडकणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पोराला चिमटा घेऊन काम करणाऱ्या महाराष्ट्रातील २२ हजार शिक्षकांना अनुदान मिळावे, याकरिता १ डिसेंबर पासून शेगावहून नागपूरसाठी पायदळ दिंडी निघाली आहे. याला भीक मांगो आंदोलन म्हणून संबोधण्यात आले आहे. शेगावपासून या आंदोलनाला सुरूवात करताना अनुदान मिळत नसणारे ५ हजार शिक्षक येथे जमले होते. या दिंडीचे नेतृत्व शिक्षक मतदार संघाचे आ. श्रीकांत देशपांडे, पुण्याचे आ. दत्ता सावंत, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर करीत आहे. ४ डिसेंबर रोजी ही दिंडी बडनेऱ्यात पोहोचली, आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाने आम्हाला सामाजिक बांधिलकी म्हणून एक रुपया भीक द्या. तोपर्यंत अनुदानाचा निर्णय घेणार नाही, तोपर्यंत अशा पध्दतीने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आ. श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. यावेळी सैय्यद राजीक, विलास राऊत, नीलेश देशमुख, सुभाष धोटे, विजय नागपूरे, सदीप पाचपोरे, वकील दानीश आनंद इंगोले, प्रदीप सिंघई, मिलिंद चिरडे, भाष्कर सुपारे, समाधान गाडगे आदी उपस्थित होते.