भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथे शासनाच्या कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ कृषी विभागाच्या वतीने बीबीएफ पेरणी करून करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने दिनांक २१ जून ते १ जुलै या कालावधीमध्ये कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत बीबीएफ पद्धतीने लागवड, बीज प्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर, कापूस एक गाव एक वाण, विकेल ते पिकेल, मग्रारोहयोंतर्गत फळबाग लागवड, रिसोर्स बँकेतील शेतकरी संवाद, नियमित महत्त्वाचे पिकावरील कीड व रोग उपाययोजना, कृषी दिन आणि मोहिमेचा समारोप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक २१/०६/२०२१ रोजी बीबीएफ लागवड तंत्रज्ञान याविषयी प्रचार प्रसिद्धी करून बीबीएफ पद्धतीने पिकांची लागवड करावयाची आहे. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भातकुलीअंतर्गत मंडळ कृषी अधिकारी, टाकरखेडा शंभू अधीनस्त मौजा खारतळेगाव येथे बाळू बसवंत गुडदे, प्रफुल पंढरी मसाने यांच्या शेतामध्ये सोयाबीनची बीबीएफ पद्धतीने पेरणी करून कृषी संजीवनी मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील पावसाचा लहरीपणा लक्षात घेऊन जास्तीत जास्त क्षेत्रावर सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद पिकांची लागवड बीबीएफ पद्धतीने करावी, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक सीमा देशमुख व कृषी सहायक विलास कराळे यांच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.
===Photopath===
250621\img-20210625-wa0015.jpg
===Caption===
खारतळेगाव येथे बीबीएफ पेरणी करून कृषी संजीवनी मोहीमेची सुरुवात