येथील बुद्ध विहारात दररोज वंदना, ध्यान व योगा व दर रविवारी बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित भंते धम्म कीर्ती यांचे प्रवचन होत असून, उपासक-उपासिका त्याचा लाभ घेत आहेत. आषाढी पौर्णिमेपासून बुद्ध आणि त्याचा धम्म'' या ग्रंथाचे वाचन दुपारच्या सत्रात भंते धम्म कीर्ती व संध्याकाळच्या सत्रात धम्म उपासक अशोक मोटघरे करीत आहेत. महादेव दुर्योधन, वामन गजभिये, अरविंद मेश्राम, प्रभाकर गेडाम, सिद्धार्थ उके, प्रमोद रामटेके, राजेंद्र पाटील, सुरेश मेश्राम, नागोराव दुर्योधन, माणिकराव गजभिये, अशोक मोटघरे, भीमशंकर चव्हाण, विलास डोळस, गजानन कांबळे, किशोर ताकसांडे, निखिल खडसे तसेच उपासिका हर्षला खडसे, नलिनी वासनिक, विद्या कांबळे, शोभा सोमकुंवर, सुवर्णा तानोले, कमल मेश्राम, वनिता पानतावणे, रेखा खडसे, शारदा वानखडे, निर्मला घोडेस्वार, मीना गजभिये, करुणा स्थूल, लक्ष्मी मेश्राम, माया पाटील, अंतकला रामटेके, ज्योती हुमणे, बेबी लांडगे, राजश्री मेश्राम, धनश्री मेश्राम, पायल वानखडे, खुशी मेश्राम, अनु मेश्राम यांचा सहभाग असतो.
चांदूर रेल्वे मूलगंध कुटी बुध्दविहार येथे वर्षावासाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:19 AM