काँग्रेसचे शहराध्यक्षपद : पक्षनिष्ठेवर पुन्हा एकवार शिक्कामोर्तबअमरावती : शहर काँग्रेसची धुरा पुन्हा एकदा विश्वासराव देशमुखांकडे येण्याचे राजकीय संकेत आहेत. सिनिअर शेखावंतासह माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी पक्षश्रेष्ठींना विश्वासराव देशमुखच कसे योग्य, हे पटवून दिले. शहराध्यक्षपदावर विश्वासरावांच्या नावाची घोषणा होणे तेवढे बाकी असल्याचा दावा राजकीय सूत्रांकडून होत आहे.काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष संजय अकर्ते यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने नवा शहराध्यक्ष कोण? या प्रश्नाने काही महिन्यांपासून उचल घेतली आहे. रावसाहेब शेखावतांचा मागील निवडणुकीत पराभव झाला असला तरी मागील वर्षीपर्यंत शहर काँग्रेसवर त्यांचे एकहाती वर्चस्व होते. मात्र, त्यानंतर राजकीय स्थित्यंतरे आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले आणि स्थानिक काँग्रेसमध्ये शेखावतांना राज्यात खोडकेंचा प्रतिस्पर्धी मिळाला. जुनेच मोहरे मैदानात !अमरावती : त्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक बबलू शेखावत यांचे नाव अग्रमानांकित होते. मात्र, महिनाभराच्या कालावधीत मोठा उलटफेर होऊन सिनिअर शेखावतांसह रावसाहेबांनी शहराध्यक्ष पदासाठी माजी शहराध्यक्ष विश्वासराव देशमुख यांचे नाव पुढे केले आहे. या संदर्भात पक्षनिरीक्षक मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी देवीसिंग शेखावत यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.माजी आमदार म्हणून शहर काँग्रेसची धुरा रावसाहेब शेखावतांकडेच आहे. त्याचवेळी बबलू शेखावतांसाठी सभापतिपद भूषविले. त्यांची शहराध्यक्षपदावर वर्णी लावल्यास कौटुंबिक राजकारणाचा ठपका ठेवला जाऊ शकतो. याशिवाय विश्वासरावांचा अनुभव बबलू शेखावतांच्या तुलनेत अधिक आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके यांच्याकडून विश्वासराव देशमुखांच्या नावाला विरोध होणार नाही, हे लक्षात घेऊन विश्वासराव देशमुख यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.१९८५ मध्ये तिवसा विधानसभा लढवून राजकारणात आलेल्या विश्वासराव देशमुखांनी मागील विधानसभेत रावसाहेब शेखावंतासाठी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. ते लक्षात घेऊन पुन्हा एकदा सुनील देशमुखांना टक्कर देण्यासाठी जुनाच चेहरा मैदानात उतरविण्याची रणनिती आखण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर विश्वासरावांच्या नावाची औपचारिक घोषणा केव्हा होईल आणि दुसरीकडे स्पर्धेत असलेले बबलू शेखावत नेमकी कुठली भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.सर्व समावेशक चेहरारावसाहेब शेखावतांच्या विजयात मोलाचा वाटा असणाऱ्या विश्वासराव देशमुख यांच्याशी मध्यंतरीच्या काळात शेखावंत कुटुंबीयांचे मतभेद झाले होते.देविसिंग शेखावतांना पुन्हा एकदा विश्वासराव देशमुखांवर 'विश्वास' दर्शविला आहे. बहुजन आणि सर्वसमावेश चेहरा म्हणून शेखावत कुटुंबीयांनी विश्वासराव देशमुखांना पसंती दिल्याची माहिती आहे.
शेखावतांचा देशमुखांवर 'विश्वास' !
By admin | Published: May 05, 2016 12:27 AM