लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : 'मी करेन ते होईल का, या शंकेऐवजी मी जे करेन ते यशस्वी होईलच,' असा दुर्दम्य विश्वास बाळगून स्वप्नपूर्तीच्या दिशेने सहज पाऊल टाका. मी खात्री देतो- यश तुमचेच असेल, यशाचा असा अनुभवसिद्ध मंत्र 'चला हवा येऊ द्या'फेम ख्यातनाम सिनेअभिनेता भारत गणेशपुरे यांनी तरुणाईला दिला.'लोकमत'च्या अमरावती युनिट कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. दिलखुलास गप्पा केल्या. यावेळी 'लोकमत'चे संपादकीय प्रमुख गणेश देशमुख आणि सहकारी उपस्थित होते.मूळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेले भारत गणेशपुरे हे गणपती, महालक्ष्मी पूजनानिमित्त अमरावतीत घरी येतात. दोनेक दिवस मुक्कामी असतात. यशाच्या आभाळाला वारंवार स्पर्श करीत असतानाही, त्यांचे पाय आजही जमिनीवरच असल्याचे त्यांच्याशी केलेल्या गप्पांदरम्यान जाणवले.अमरावतीवर भरभरून प्रेम करणारे भारत हेदेखील इतर सर्व अमरावतीकरांप्रमाणे येथील सांबारवडीवर फिदा आहेत. घरी कधीकधी मी स्वत: सांबारवडी करून तिचा आस्वाद घेतो, हे त्यांनी भूषणाने नमूद केले.परेश रावल, नसरुद्दीन शहा आणि बीग बी अमिताभ बच्चन यांचा अभिनय भारत गणेशपुरे यांना आवडतो. अमितजींसोबत जाहिरातीत त्यांनी काम केले. तथापि या तीनही कसलेल्या अभिनेत्यांसोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. हयात असलेल्या अभिनेत्रींमध्ये विद्या बालनचा अभिनय त्यांना कसदार वाटतो. मराठी सिनेसृष्टीने हिंदी आणि इंग्रजीच्या तुलनेत सातत्याने वैविध्यपूर्ण विषय हाताळले. विषयातील नाविन्य जपणाºया मराठी नाट्यमंचाची त्यांनी अशी आवर्जून नोंद घेतली. अमरावतीमध्ये एअरपोर्ट असावे, असे त्यांना मनापासून वाटते. अमरावतीतून रोज दोन विमाने सहज चालू शकतील इतकी क्षमता या अंबानगरीची आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. उद्योगाचा गतिमान मार्ग त्यातून निर्माण होऊ शकेल, असे त्यांना वाटते.
जे कराल ते विश्वासपूर्वक करा, यश तुमचेच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 11:13 PM
'मी करेन ते होईल का, या शंकेऐवजी मी जे करेन ते यशस्वी होईलच,' असा दुर्दम्य विश्वास बाळगून स्वप्नपूर्तीच्या दिशेने सहज पाऊल टाका.
ठळक मुद्देभारत गणेशपुरेंची 'लोकमत'ला भेट : अमरावतीतून उडू शकतात रोज दोन विमाने