(असाईनममेंट)
अमरावती : कोरोनाची तिसरी लाट भारताच्या उंबरठ्यावर असल्याचा अलर्ट जागतिक आरोग्य संघटनाद्वारे देण्यात आला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे हे संकट ओढावणार आाहे. अन्य देशांमध्ये या लाटेला सुरुवात झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. त्यामुळे तयारीच्या दृष्टीने आरोग्य विभागाची लगबग वाढली आहे.
तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका बालकांना असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बालरोगतज्ज्ञांच्या नियुक्तीसह बालकांसाठी स्वतंत्र बेड तसेच खासगी रुग्णालयातदेखील बालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था राहावी, यासाठी महापालिका आयुक्त व जिल्हा शल्यचिकित्सकांनी तयारी सुरू केलेली आहे. जिल्ह्यात फेब्रुवारीपासून सुरु झालेला कोरोनाचा संसर्ग मे अखेरपासून माघारला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला थोडी उसंत मिळत नाही तोच आता तिसऱ्या लाटेचा अलर्ट आलेला आहे. यामध्ये चिल्ड्रेन वॉर्डमध्ये ८० खाटांची उपलब्धता आहे. त्यापैकी ५१ ऑक्सिजन बेड, २० आयसीयू बेड आहेत. खासगी पेडियाट्रिक कोविड रुग्णालयापैकी पारिजात हॉस्पिटलमध्ये ४० व गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये ६० खाटा आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी दिली.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बालकांवरील उपचारांसाठी ८० खाटांचा स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात आला तसेच उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातही बालरुग्णांसाठी ऑक्सिजन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. खासगी बाल रुग्णालयांतही ऑक्सिजन बेडची तजवीज करण्यात आल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
बॉक्स
ऑक्सिजन प्लांटची उभारणी
* सुपर स्पेशालिटी रुग्णालयात फेज-१मध्ये सहा किलोलिटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टँक
* याच ठिकाणी दुसऱ्या फेजमध्ये २० किलोलिटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टँक
* जिल्हा सामान्य रुग्णालयात १० किलोलिटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टँक
* पीडीएमसी येथे ६ किलोलिटर व अचलपूर येथे एसडीएच टँक उभारणी करण्यात येणार आहे.
बॉक्स
ऑक्सिजन बेडची स्थिती
जिल्ह्यात शासकीय व खासगी अशा दोन्ही प्रकारात तीन हजार बेडची तयारी आरोग्य यंत्रणांद्वारे करण्यात आलेली आहे. याशिवाय श्रीगुरुदेव आयुर्वेद कॉलेजमध्ये ऑक्सिजनचे १०० बेड, अचलपूर येथे ४० व अंजनगाव सुर्जी येथे ४० बेड राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
बॉक्स
लहान मुलांसाठी सेंटर
सुपर स्पेशालिटीमध्ये ८० बेडचा वाॅर्ड बालकांसाठी राहणार आहे. याशिवाय खासगी दोन रुग्णालयांमध्ये १०० बेडची व्यवस्था बालकांसाठी करण्यात आले आहे. प्रत्येक डीसीएचमध्ये १० व डीसीएचसीमध्ये पाच बेड बालकांसाठी रखीव ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
कोट
तिसऱ्या लाटेची तयारी सुरू
तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. याशिवाय बालकांसाठी स्वतंत्र वाॅर्ड, बालरोगतज्ज्ञ व ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले व पुरेशा औषधसाठ्याची मागणी नोंदविण्यात आलेली आहे.
डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक
पाईंटर
पहिली लाट
एकूण रुग्ण : १०,६८२
बरे झालेले रुग्ण : ८,९३०
मृत्यू : २२८
-----------
दुसरी लाट
एकूण रुग्ण : ७०,५०७
बरे झालेले रुग्ण : ६५,२४०
मृत्यू : १,०४३
------------
एकूण लसीकरण : ७,४३,५७१
पहिला डोस : ५,५२,३७२
दुसरा डोस : १,९१,१९९
--------------------
२५ टक्के लोकांचेच लसीकरण पूर्ण
१८ वर्षे वयोगटावरील एकूण लोकसंख्या : २३,३०,८५७