लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. विमानतळावर पायाभूत सुविधांबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून, डीपीआरला शासनाची मान्यता मिळताच विकास कामांचे अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया आणि निधी मंजूर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या सर्व बाबी पूर्ण करण्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या वरिष्ठांचे मौखिक आदेश असल्याची माहिती आहे.दिल्ली येथील राईटस् कंपनीने विमानतळाचे माती परीक्षण पूर्ण केले आहे. सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा विद्युतीकरण कामाचा असणार आहे. त्यामुळे गत आठवड्यात एका चमुने विमानतळावर प्रस्तावित विजेच्या कामांसंदर्भात पाहणी केली आहे. तर दुसरीकडे शासनाने बेलोरा विमानतळाचा डीपीआर तयार करण्याला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. शासनाने विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिगंसंदर्भात ‘राइट्स’वर दोन कोटी खर्च करण्याला मान्यता प्रदान केली आहे. टोपोग्राफिकल सर्व्हे, धावपट्टीचे निरीक्षण, एटीएस टॉवरची पाहणी आटोपली आहे. नाइट लँडिंग, रन-वे लांबी वाढविणेबाबत नव्याने सर्वेक्षण करण्यात आले आहे. विमानांच्या नाईट लँडिंगसंदर्भात विमानतळ परिसरातच ११ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारले जाणार आहे. रन-वेवर येणाऱ्या समस्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, डीपीआरमध्ये इत्थंभूत बाबींचा अंतर्भाव असणार आहे. लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रशासनाने विमानतळावर विविध विकासकामांची पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची जोरदार तयारी चालविली आहे.विमानतळासाठी ६० कोटींची प्रतीक्षाबेलोरा विमानतळाचे सर्वेक्षणाची कामे पूर्णत्वास आली आहे. आता निधीची आवश्यकता असून, त्याशिवाय उर्वरित विकास कामे पूर्ण होऊ शकणार नाही, हे वास्तव आहे. यापूर्वी शासनाने १५ कोटी रूपये मंजूर केले, उर्वरित ६० कोटीदेखील मंजूर करणे काळाची गरज आहे. त्याअनुषंगाने लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी जनतेची आहे.टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवरचा प्लॅन तयारबेलोरा विमानतळाहून विमानसेवा सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार विमानतळ विकास कंपनीने विकासकामे हाती घेतली आहेत. माती परीक्षणानंतर विद्युत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दरम्यान राइटस् कंपनीकडून टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवर उभारणीचे नकाशा तयार करण्यात आला आहे. धावपट्टीची लांबी वाढविण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे.
बेलोरा विमानतळाचा ‘डीपीआर’ अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:18 AM
बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. विमानतळावर पायाभूत सुविधांबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून, डीपीआरला शासनाची मान्यता मिळताच विकास कामांचे अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया आणि निधी मंजूर केला जाणार आहे.
ठळक मुद्देआचार संहितेपूर्वीच निविदांची लगबग : सर्वेक्षण पूर्ण, विद्युत कामांसंदर्भात दिल्ली येथील चमूची पाहणी