शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

महापालिकेतील लेटलतिफांवर कारवाईचा दंडुका

By admin | Published: March 01, 2017 12:05 AM

महापालिकेतील लेटलतिफ अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दंडूका उगारण्यात येणार आहे....

प्रशासकीय आचारसंहिता अनिवार्य : ‘थम्ब’वर नजरअमरावती : महापालिकेतील लेटलतिफ अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दंडूका उगारण्यात येणार आहे.त्यासाठी आयुक्तांनी थंब मशिनचा संपुर्ण डाटा मागविला आहे.वेळोवेळी निर्देश देऊनही तालावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेगळी यादी तयार होत आहे.महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशासकीय आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे.त्या अनुषंगाने आयुक्त हेमंत पवार यांनी कडक पवित्रा घेतला आहे.आयुक्त दर सोमवारी सकाळी १० वाजता विभागप्रमुखांची बैठक घेतात.मात्र त्या बैठकीलाही अनेक विभागप्रमुख दांड्या मारतात तर काही जण उशिरा येतात.ही बाब लक्षात येताच त्यांनी अशा लेटलतिफ अधिकारी कर्मचाऱ्यांना शो कॉज दिल्या होत्या .त्यानंतर काही दिवस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी १० ते ६ ची वेळ पाळली.मात्र आता पुन्हा महापालिकेत येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.सामान्य प्रशासन विभाग,लेखा विभाग ,आरोग्य विभाग,बांधकाम विभाग आणि एडीटीपी मधील काही कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.दांडीबहाद्दराची संख्या बांधकाम विभागात अधिक आहे.महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात सकाळी १० वाजता अतिशय सामसूम असते.त्यावरून पाचही झोन कार्यालयातील उपस्थितीची कल्पना न केलेलीच बरी.सायंकाळी पाचच्या सुमारास प्रत्येक विभागातील एक एक कर्मचारी हळू हळू कार्यालयाबाहेर निघू लागतो.दुपारी २ ला घरी जेवणास गेलेले कर्मचारी महापालिकेत केव्हा परततात ,याचा आढावा घेतल्यास आयुक्तांच्या पुढे भासविण्यात येणारे चित्र किती तकलादू आहे,हे स्पष्ट होईल.(प्रतिनिधी)बायोमेट्रिक बनल्यात शोभेच्या वस्तू४महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह दवाखाने ,बाजार परवाना विभाग व अन्य काही ठिकाणी बायोमॅट्रीक यंत्र लावण्यात आले आहेत.मात्र मुख्य कार्यालयाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही थंब मशिनचा डाटा सिस्टिममॅनेजर पर्यंत पोहोचविला जात नाही.अजूनही थंब मशिनचा डाटा प्रमाणभूत मानून वेतन काढले जात नाही.त्यामुळे अनेक कर्मचारी बायोमॅट्रीक मशिनमध्ये ‘थंब ’ करीत नाहीत.