शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

फेसबूकवर अनोळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान! हनी ट्रॅप वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:10 AM

( असायमेंट) संदीप मानकर - अमरावती : वॉलपेपरवर सुंदर मुखडा असलेल्या फेसबूक अकाऊंटवरून अनोळखी स्त्रीने चॅटिंग केल्यास सावध व्हा. ...

( असायमेंट)

संदीप मानकर - अमरावती : वॉलपेपरवर सुंदर मुखडा असलेल्या फेसबूक अकाऊंटवरून अनोळखी स्त्रीने चॅटिंग केल्यास सावध व्हा. कारण फेसबूकवरून ओळख करून घेत हनी ट्रॅपमध्ये ओढून तरुणांना लुटणारी ऑनलाईन टोळ्या सक्रिय आहेत. गत काही महिन्यात सायबर गुन्हेगारीचा हा नवीन ट्रेंड समोर आला असून, या ‘सेक्स्टॉर्शन’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत.

अमरावती शहर हद्दीतील शहर सायबर सेलकडे तसेच ग्रामीण सायबर सेलकडे फेसबूकवरून अनोळखी सुंदरी किंवा मुलीच्या नावाने तयार करण्यात आलेल्या फेक अकाऊंटवरून हनी ट्रॅप किंवा ‘सेक्स्टाॅर्शन’चे बळी ठरल्याची काही प्रकरणे समोर आली आहे. फसवणूक झालेल्या पीडितांनी सायबर पोलिसांकडे तर धाव घेतली, मात्र बदनामीपोटी तक्रार किंवा गुन्हा नोंदविण्याचे टाळले. जरी पोलिसांच्या रेकॉर्डला बोटावर मोजण्याइतपत गुन्हे दाखल झाले असले तरी लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर फसवणूक झालेल्या अशा ३० जणांनी संपर्क केल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.

फेसबूकसह मेसेजिंग ॲप, डेटिंग ॲप, पॉर्न साईट आदी ठिकाणी सायबर गुन्हेगार बनावट खाती बनवून पीडित व्यक्तींना आकर्षित करतात. समोरील व्यक्ती ही हायप्रोफाईल व सुंदर तरुणी असल्याचे भासविली जाते. प्रथम पीडित व्यक्तींसोबत चॅटिंग करून मैत्री केली जाते. नंतर प्रेमाच्या गप्पा अश्लील वळणावर नेल्या जातात. बहुतांश प्रकरणात पीडित व्यक्तीला फेसबूक, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल करून एकांतात नग्न होण्यास, अश्लील हावभाव करण्यास सांगतात. स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्याचे चित्रीकरण होते. हे व्हिडीओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जाते. पाच हजारांपासून तर कितीही रक्कम मागितली जाते. बदनामीच्या भीतीपोटी अनेक जण सायबर गुन्हेगारांना ऑनलाईन पैसे पुरवितात. त्यांची मागणी वाढल्यानंतरच पोलिसांत धाव घेतात. यातील पीडित व्यक्ती या बहुतांश ग्रामीण भागातील व्यावसायिक वा उच्चभ्रू कुटुंबातील तरुण हे आहेत.

बॉक्स:

सेक्स्टाॅर्शन म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तींच्या ऑनलाईन संपर्कात येऊन त्याचा मोबाईल, कम्प्यूटर अथवा लॅपटॉपमध्ये घुसखोरी करणे, त्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणे, व्हिडीओ, छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले जाते.

बॉक्स : या लोकांना केले जाते लक्ष्य

सायबर गुन्हेगार पिडीत व्यक्तीला जाळण्यात ओढण्याआधी फेसबुकवर आधी त्याची प्रोफाईल पाहतात. सदर व्यक्ती डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक, वकील अथाव उच्चपदस्थ नोकरी करणारी असेल, तर त्यांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली जाते. नगर, शहरासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले असून, काहींनी भीतीपोटी पैसे दिल्याचे सायबर सेलकडे आलेल्या तक्रारीतून समोर आले आहे.

बॉक्स : लोकांनी अशी घ्यावी काळजी

१) सोशल मीडियावर अनोळखी व्यकींच्या संपर्कात येऊ नये. आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये.

२) व्हिडीओ कॉलवर समोरील व्यक्ती सांगेल तसेच कृत्य करू नये.

३) आपल्या फोनमध्ये खासगी, अर्धनग्न व नग्न फोटो व्हिडीओ सेव्ह करून ठेवू नये.

४) सेक्स्टाॅर्शनसंदर्भात काही घटना घडली, तर कुणालाही पैसे देऊ नये. तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.

बॉक्स:

महिलेचीही होऊ शकते फसवणूक

सेक्स्टाॅर्शनच्या प्रकारात तरुणांचीच फसवणूक होते असे नाही, महिलासुद्धा गोवल्या गेल्या आहेत. काही आठवड्यापूर्वी ग्रामीण सायबर पोलिसांकडे एक प्रकरण दाखल झाले होते. त्यामध्ये फेसबूकवर पीडिताच्या मैत्रिणीच्या नावाने पुरुषाने बनावट अकाऊंट तयार करून तिला जाळ्यात ओढले. तिला माहिती झाले, मात्र बदनामी करतोे, अशी धमकी देत खासगी अवयव दाखविण्यास सांगितले. त्याचे रेकॉडिंग करून तसेच फोटो काढून पैशांसाठी तिला तगदा लावला. नकार मिळाल्याने फेसबूकवरील तिच्या फ्रेंडलिस्टमध्ये हे व्हिडीओ, फोटो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कोट

फेसबूकवर अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करू नका. आधी सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी सेटिंग करून घ्या. अलीकडे सेक्स्टाॅर्शनचा नवा ट्रेंड आला आहे. नागरिकांनी यापासून सतर्क राहावे. फसवणूक झाल्यास तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.

- सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक, सायबर सेल