लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तापमान वाढल्याने कूलरचा वापर सुरू झाला आहे. पाण्यातून वीज प्रवाहित होऊ शकते. अशा वेळी विजेपुढे चुकेला क्षमा नाही, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे कूलर लावताना तसेच त्यात पाणी भरताना सुरक्षेची योग्य खबरदारी घणे महत्त्वाचे ठरते.कधी कूलरजवळ खेळताना विजेचा धक्का बसल्याने, तर कधी टुल्लू पंप सुरू करतेवेळी विजेचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना सातत्याने घडतात. यांसारखे अनेक अपघात उन्हाळ्याच्या दिवसांत होतात. ते टाळण्यासाठी ग्राहकांनी कूलरचा वापर सदैव थ्री-पीन प्लगवरच करावा. घरात अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसवून घ्यावे. बाजारात हे उपकरण सहजरीत्या उपलब्ध आहे. विजेचा धक्का बसताच या उपकरणामुळे वीज प्रवाह खंडित होऊन पुढील अनर्थ टाळता येतो तसेच घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी.कूलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजपुरवठा येऊ नये, याकरिता कूलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल अशी व्यवस्था करावी, जेणेकरून कूलरच्या लोखंडी बाह्यभागात वीज प्रवाहित झाल्यास त्याचा धक्का लागणार नाही. कूलरमध्ये पाणी भरतेवेळी आधी कूलरचा वीज प्रवाह बंद करून प्लग काढावा व त्यानंतरच त्यात पाणी भरावे. कूलरच्या आतील वीज तार पाण्यात बुडालेली नसल्याची खात्री करून घ्यावी. कूलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे वीज प्रवाहाच्या संपर्कापासून मुक्त राहता येईल, असे महावितरणच्या अमरावती परिमंडळाने कळविले आहे.ओल्या हाताने स्पर्श टाळावाओल्या हाताने कूलरला स्पर्श करू नये. कूलरची वायर सदैव तपासून बघावी. फायबर बाह्यभाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कूलरचा वापर प्राधान्याने करणे महत्त्वाचे आहे. घरातील मुले व इतर सदस्य कूलरच्या सान्निध्यात येणार नाही, याची खबरदारी घेऊनच कूलर ठेवण्यात यावा.पंपातून पाणी येत नसेल, तर वीजपुरवठा आधी बंद करून प्लग काढल्यानंतरच पंपाला हात लावावा. पंप पाण्यात बुडला नसल्याची खात्री करून घ्यावी. पंपाला वीज पुरवठा करणारी वायर पाण्यात बुडाली नसावी. पंपाचे अर्थिंग योग्य असल्याचे तपासून घ्यावे. पंपातून नळ वाहिनीत वीज प्रवाहित होणार नसल्याची काळजी घ्यावी.
सावधान... विजेपुढे चुकीला क्षमा नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 11:07 PM
तापमान वाढल्याने कूलरचा वापर सुरू झाला आहे. पाण्यातून वीज प्रवाहित होऊ शकते. अशा वेळी विजेपुढे चुकेला क्षमा नाही, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे कूलर लावताना तसेच त्यात पाणी भरताना सुरक्षेची योग्य खबरदारी घणे महत्त्वाचे ठरते.
ठळक मुद्देमहावितरणचे आवाहन : निष्काळजीपणामुळे जीव जाऊ शकतो