शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

खबरदार! कामांच्या गुणवत्तेशी तडजोड कराल तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2022 12:11 AM

  बेलोरा विमानतळाचे कामाला पुढील आठवड्यात सुरुवात होत आहे. रन वेवर फायनल कोट टाकण्यात येणार आहे. २३०० मीटरपर्यंत हे काम वाढविण्यात येईल. सन २०१८ नंतर ज्या कामांना निधी मिळालेला नाही, त्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधी देणार असल्याचे फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणारी कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्वक व्हावी. निधी संपूर्णपणे खर्ची पडावा. त्यासाठी आवश्यक मान्यता आदी प्रक्रिया गतीने पूर्ण करावी. कामाच्या गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिले.अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीची नवे शीर्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती ना. देवेंद्र फडणवीस यांनी  दिली.  बेलोरा विमानतळाचे कामाला पुढील आठवड्यात सुरुवात होत आहे. रन वेवर फायनल कोट टाकण्यात येणार आहे. २३०० मीटरपर्यंत हे काम वाढविण्यात येईल. सन २०१८ नंतर ज्या कामांना निधी मिळालेला नाही, त्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधी देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार बच्चू कडू, आमदार रवि राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, आमदार बळवंत वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार किरण सरनाईक, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विकासकामांच्या प्रशासकीय, तांत्रिक मान्यता आदी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून कामांना वेग द्यावा. सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. कामे गुणवत्तापूर्ण असावीत. कामांच्या दर्जात तडजोड खपवून घेणार नाही. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी नवीन हेड तयार करण्यात येईल, असे सुतोवाच त्यांनी केले. अमरावती विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. नाईट लँडिंगची सुविधा आधी पूर्ण करावी. विमानतळ धावपट्टीची लांबी-२ हजार ३०० मीटर करण्यासाठी प्रस्ताव देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 

टॅग्स :AirportविमानतळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस