आॅनलाईन लोकमतअमरावती : कोतवाली हद्दीतील गजबलेल्या बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसांनी मोहीम छेडली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे पोलिसांनी हातगाडीचालकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.कोतवाली ठाण्याच्या हद्दीत शहराची मुख्य बाजारपेठ असून, परिसर सर्वाधिक गजबजला असतो. वाहतुकीच्या सततच्या वर्दळीत हातगाडीचालकांची मनमानीही दिसून येते. रस्त्याचा अर्धाअधिक भाग व्यापून दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. यामुळे कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी त्यांना समजावून सांगण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होऊ नये, या पद्धतीने हातगाडी लावण्यास गेल्या तीन दिवसांपासून सायंकाळी पोलीस ताफा विनंती करीत आहे.कोतवाली पोलिसांनी सोमवारी इतवारा बाजारातील अतिक्रमण हटविले, तर मंगळवारी तहसील कार्यालयासमोरील भागात लागणाºया भाजीपाला विक्रेत्यांना हातगाडी व्यवस्थित लावण्यासाठी सांगितले. त्याचप्रमाणे गांधी चौक, चित्रा चौक व चौधरी चौकापर्यंत लागणाºया हातगाड्या रोडच्या कडेला लावण्याचे सूचना केल्या. आता जे हातगाडी चालक सूचना देऊनही ऐकत नसतील, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
खबरदार, वाहतुकीस अडथळा कराल तर..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:06 PM
कोतवाली हद्दीतील गजबलेल्या बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसांनी मोहीम छेडली आहे.
ठळक मुद्देकोतवाली पोलिसांची मोहीम : हातगाड्या रस्त्यावर उभ्या दिसल्यास कारवाई