जिल्ह्यासह वरूड तालुक्यात कोरोनाचा विळखा वाढला असून, पुसला परिसरातदेखील कोरोना उद्रेक वाढत आहे. मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग या नियमांचा फज्जा उडाला आहे. स्थानिक प्रशासनसुद्धा पाहिजे तशी जबाबदारी घेत नसल्याचे दिसून येत आहे. परिसरात कोरोना रुग्ण आढळून आला की, त्या रुग्णांच्या घराच्या जवळ केवळ रस्त्यावर प्रतिबंध क्षेत्र म्हणून पट्ट्या आखला जाताे. पण ते क्षेत्र सॅनिटाइज होत नसल्याची ओरड आहे. यामुळे गाव खरेच सुरक्षित राहणार आहे का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे. मागील वर्षांत सायरन वाजताच नागरिक घरात बसायचे. आता पोलीस वाहन फिरत नसल्याने नागरिक रस्त्यावर बिनधास्त मुक्त संचार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सावधान, पुसला परिसरत कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:12 AM