(असायमेंट)
अमरावती/ संदीप मानकर
अलीकडे बेरोजगार युवकांची डमी वेबसाईइटच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. डमी वेबसाईटद्वारे शहरात गत तीन वर्षांत पाच जणांची फसवणूक झाली असून, त्यासंदर्भात अमरावती शहरातील नागरिकांना लाखोंचा गंडा घातला असल्याची बाब सायबर सेलने दिलेल्या माहितीवरून समोर आली आहे.
कोरोनाकाळातही पुणे, मुबंई येथे जॉब करणाऱ्या तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे त्यांना शासनाच्या अधिकृत वेबसाईटसदृश वेबसाईटवरून नोकरीचे आमिष दाखविले जात आहे. त्यावर अर्ज टाकणाऱ्यांना लाखोंचा गंडा घातला गेला. नागरिकांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर या संदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांनी दिली.
नोकरीच्या नावावर आमिष देऊन आतापर्यंत शहरात शाहीन डॉट कॉम, एअरपोर्ट ॲथोरिटी इंडिया तसेच डाटा एंट्री म्हणून जॉब दिल्यानंतर त्यात चुका काढून युवकांची फसवणूक झाल्याचे काही प्रकार सायबर सेलच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. लॉकडाऊन काळात नागरिक घरात लॉक होते. सायबर गुन्हेगारांनी याचाच फायदा घेत अनेकांची ऑनलाईन फसवणूक केली आहे.
नोकरीच्या नावाखाली फसवणूक वाढली
२०१९- २
२०२०- ३
२०२१ (जून पर्यंत)-
अशी होवू शकते फसवणूक
१) शाहीन डॉट कॉमवरून फसवणूक झाल्याचा एका गुन्हा शहर सायबर सेलकडे गतवर्षी दाखल झाला होता. यामध्ये फिर्यादीने नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर सायबर गुन्हेगाराने फसवणुकीच्या उद्देशाने फिर्यादीशी संपर्क केला व बनावट मुलाखत घेऊन हजारो रुपयांनी फसवणूक केली.
२) एअरपोर्ट अथॉरिटी इंडियासदृश डमी वेबसाईटवर युवकाने संपर्क साधला असता, नोकरीचे आमिष दाखवून बनावट नियुक्तिपत्र दिले, ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले. यात लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली.
३) डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन युवकाला मिळाले होते. तक्रारकर्त्यांनी संपर्क साधला असता, त्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास सांगण्यात आले. यानंतर डाटा एंट्री करताना चुका झाल्याने सिस्टीम खराब झाली, असे धमकावून नोकरी देणाऱ्याला कारवाई न होण्यासाठी पैेशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याची चौकशी पोलीस करीत आहेत.
कोट
नोकरीसंदर्भात शासानाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच नोंदणी करावी. त्यासंदर्भातसुद्धा एकदा खातरजमा करावी. फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क करावा. कुणालीही ओटीपी शेअर करू नका. अनधिकृत वेबसाईटवरून व्यवहार करताना सावध राहावे.
- सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक, सायबर सेल
१) संकेतस्थळाबदल जास्तीत जास्त माहिती मिळवा
२)अनोळखी लिंक्स किंवा संकेत स्थळावर जाण्याचे टाळा
३) धोकादायक आणि बनावट संकेत स्थळांना अँटिव्हायसव्हारे ब्लॉक करा
अशी करा खातरजमा
१) सरकारी नोकऱ्यासंदर्भात वेबसाईट असल्यास शेवटी ‘जीओव्ही डॉट इन किंवा डॉट एनआसी’ असे असते.
३) अपेक्षेपेक्षा जास्त प्रलोभने दाखविली जात असल्यास काळजी घ्यायला हवी. ज्या बँकेतून ऑनलाईन व्यवहार आपण करतो, त्या ठिकाणी झीरो बॅलन्स ठेवावे.
३) बेरोजगारांना जास्त पैसे जास्त पगार देतो, असे म्हणून जॉब दिला जात असेल व जेथे पैसे मागितले जात असतील, तेथे व्यवहार करणे टाळा, कुणालाही ओटीपी शेअर करू नका फसवणूक झाल्यास तातडीने सायबर पोलीस किंवा बँकेशी संपर्क साधा.