वरूड : स्थानिक भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को ऑप. बँकेचा रिझर्व बँकेने बँकिंग परवाना रद्द केला. यामुळे खातेदार, ठेवीदार आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली, तर ठेवीदारांच्या ठेवींचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को ऑप बँक वरूड या बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व बँक नागपूरने २० एप्रिलच्या आदेशाने रद्द केला आहे. या आदेशान्वये बँकिंग नियमन अधिनियम १९४९ (सहकारी संस्थेला लागू) च्या कलम ५६ व २२ अंतर्गत बँकिंग परवाना रद्द केला. बँकिंग नियमावली अधिनियम १९४९ च्या कलम ५ ब अंतर्गत दिलेल्या व्याख्येनुसार बँकिंग व्यवहार करण्यास सदर बँकेवर बंदी घालण्यात आली. बँकेच्या अन्य बाबींनाही जनतेकडून ठेवी स्वीकारणे, रक्कम काढू देणे यावर रिझर्व बँकेकडून बंदी घालण्यात आली. सहकार क्षेत्रातील बँकेचा परवाना रद्द होण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे.