शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

स्वच्छ भारत मिशनमध्ये राज्यात भंडारा अव्वल; जिल्हानिहाय गुणांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 6:20 PM

स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य पातळीवरील रँकिंगमध्ये सद्यस्थितीत भंडारा जिल्हा अव्वल स्थानी, तर शेवटच्या ३४ व्या स्थानावर यवतमाळ जिल्हा आहे. अभियानात प्रथम व शेवटच्या स्थानावर असलेले दोन्ही जिल्हे हे विदर्भातीलच आहे.

ठळक मुद्देयवतमाळ जिल्हा अखेरच्या ३४ व्या स्थानी

गजानन मोहोड।आॅनलाईन लोकमतअमरावती : स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य पातळीवरील रँकिंगमध्ये सद्यस्थितीत भंडारा जिल्हा अव्वल स्थानी, तर शेवटच्या ३४ व्या स्थानावर यवतमाळ जिल्हा आहे. अभियानात प्रथम व शेवटच्या स्थानावर असलेले दोन्ही जिल्हे हे विदर्भातीलच आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले जाते. राज्यात यापूर्वी पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार २ आॅक्टोबर २०१४ नंतर शौचालय बांधून त्याचा वापर करणाऱ्यांना १२ हजार व त्यापूर्वी बांधकाम झालेल्या शौचालयांना ४,५०० रुपये अनुदान दिले जाते, तर दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, स्त्री कुटुंबप्रमुख व अपंग यांना प्राधान्य दिले जाते. सोमवारी विभागीय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, अभियानाच्या राज्यस्तरीय गुणांकनात भंडारा जिल्हा अव्वलस्थानी आहे. या जिल्ह्यात २ लाख ७ हजार ६२६ कुटुंबसंख्या आहे. यामध्ये पायाभूत सर्वेक्षणानंतर ८६ हजार ५५४ शौचालयांचे बांधकाम करण्यात आलीत. आता जिल्ह्यात एकूण २ लाख ८ हजार १७९ घरामध्ये शौचालये आहेत. त्यामुळे येथे शौचालय बांधकाम शिल्लक नसल्याचे स्वच्छ भारत अभियानाच्या जिल्हास्तरीय गुणांकनाच्या अहवालात स्पष्ट आहे. याच अहवालात यवतमाळ पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात एकूण कुटुंबसंख्या ४ लाख २६ हजार ४४८ आहे. ३५७ सार्वजनिक शौचालये आहेत. पायाभूत सर्वेक्षणानंतर १ लाख ९५ हजार ६८२ शौचालये बांधण्यात आली. सद्यस्थितीत २ लाख ९५ हजार ५२० कुटुंबाकडे शौचालय आहे, तर १ लाख ३० हजार ९२८ कुटुंबाकडे नसल्याचे या अहवालात स्पष्ट आहे.वेळेवर निधीच उपलब्ध नाहीस्वच्छ भारत योजनेंतर्गत शौचालयाचा निधी बांधकामानंतर मिळतो. मात्र, अनेक कुटुंबांना शौचालयाचे बांधकामे केल्यानंतरही निधी मिळालेला नाही. १२ हजार रुपयांच्या तुटपुंज्या अनुदानात शौचालयाचे बांधकाम होणे शक्य नाही. त्यात रेतीघाटाचा हर्रास नसल्याने महागडी रेती; सिमेंट व साहित्याचे दर वाढले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पदरमोड करावी लागत आहे.राज्यातील जिल्हानिहाय रँकिंगस्वच्छ भारत मिशनच्या गुणांकनानुसार भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, जालना, कोल्हापूर, नागपूर, उस्मानाबाद, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, अकोला, बीड, लातूर, हिंगोली, अमरावती, अहमदनगर, वाशिम, गडचिरोली, परभणी, औरंगाबाद, नाशिक, धुळे, नांदेड, बुलडाणा, नंदुरबार, जळगाव व शेवटच्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान