फोटो पी ०२ वरूड
वरूड : प्रशासनाचा ताळमेळ नसल्याने वरूडचे प्रस्तावित कोविड केअर सेंटर धूळखात पडले आहे. आठ दिवसांत वरूड तालुक्यातील कोरोना संक्रमितांची संख्या हजारांवर पोहोचली आहे. एक महिन्यापासून या कोविड केंद्राबाबत निर्णय झालेला नाही. नागरिकांच्या जिवाशी न खेळता कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
शनिवारी तालुक्याात तब्बल २०४ जण कोरोना संक्रमित आढळले. यामुळे नागरिक धास्तावले असून गावागावांतील जिल्हा परिषद आणि नगर परिषद शाळा असेच लॉज, सभागृहे तालुका प्रशासनाने ताब्यात घेऊन विलगीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वरूड तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, अनेकजण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. ना बफर झोन, ना कंटेनमेंट झोन, अशी अवस्था आहे. यातच संक्रमित रुग्ण बाहेर फिरत असल्याने याचा प्रादुर्भाव सुद्धा होत असल्याचे सांगण्यात येते.
केवळ बेनोडा येथे मर्यादित व्यवस्था
येथे करा ना व्यवस्था वरूड, शेंदूरजनाघाट नगर परिषदच्या शाळा आणि लॉज, सभागृहे तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ताब्यात घेऊन संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करावे, कंक्रमित रुग्णांना होम आयसोलेटेड करणे बंद करावे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
बॉक्स २
तहसीलदार म्हणतात परवानगी यायची आहे
कोविड केअर सेंटरबाबत तहसीलदार किशोर गावंडे यांना विचारणा केली असता, ते सुरू करण्याबाबत परवानगी मिळालेली नाही. परवानगी येताच ते सुरू करता येईल. याबाबत वरिष्ठ अधिकारी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.