शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

सरळसेवेतील आरएफओंच्या बढतीमागे मोठे अर्थकारण? उच्च न्यायालयातील याचिका दुर्लक्षित

By गणेश वासनिक | Published: March 10, 2024 6:47 PM

राज्यात १७५ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सहायक वनसंरक्षक पदावर बढती देण्याकरिता महसूल विभाग वाटप करण्यात आले आहे.

अमरावती: राज्यात १७५ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सहायक वनसंरक्षक पदावर बढती देण्याकरिता महसूल विभाग वाटप करण्यात आले आहे. मात्र, सहायक वनसंरक्षकांच्या पदोन्नतीला ‘ब्रेक’ लागण्याची दाट शक्यता असून, ही बढती रोखण्यासाठी खासदार-आमदार पुढे सरसावले आहेत. कारण आरएफओंचा १८ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी हा सेवेत धरण्यात आल्यामुळे अनेकांना ५ वर्षांत बढती मिळेल, तर इतरांवर अन्याय होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.राज्याच्या वन विभागात सन २०१६ मध्ये सरळसेवेने दाखल झालेल्या १६४ आरएफओंना महाराष्ट्र, उत्तराखंड, आसाम येथे १८ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. तर त्यानंतर ५५ प्राप्त उमेदवारांना कोईम्बतूर, दार्जिलिंग येथे प्रशिक्षणास पाठवले होते. 

या आरएफओंना १८ महिन्यांचा सेवा कालावधी गृहित धरून २१९ जणांना सहायक वनसंरक्षक पदावर बढती दिली जात असल्याने वन विभागात असंतोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात सहायक वनसंरक्षक प्रशिक्षण कालावधी सेवा गृहित धरण्याकरिता न्यायालयात गेलेले असताना न्यायालयाने याचिका फेटाळून प्रशिक्षण काळ हा सेवाकाळ म्हणून ग्राह्य धरण्यास नकार दिलेला आहे. परंतु, असे असताना राज्यात २४९ आरएफओंना बढती देताना प्रशिक्षण कालावधी सेवाकाळात धरण्यात येत असल्याने पदोन्नत आरएफओंवर याचा प्रभाव पडलेला आहे. आनंद गायेंके यांनी या प्रकरणी संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात रिट पिटीशन क्रमांक ३५१८/२०२० ही दाखल असताना आरएफओंना पदोन्नती देण्याचा घाट रचला जात आहे. आर्थिक उलाढालीची शक्यता?आरएफओंना बढती देताना १८ महिन्यांआ प्रशिक्षण कालावधी हा सेवाकाळात धरण्यात आल्यामुळे सरळसेवेतील २१९ आरएफओंना पदोन्नतीचा लवकरच लाभ मिळणार आहे. सेवाकाळ कालावधी गृहित धरावा, यासाठी काहींनी थेट मंत्रालयात ‘फिल्डिंग’ लावली असून, प्रशिक्षणाचा काळ सेवाकाळात बदल करण्यासाठी लक्ष्मीदर्शन जोरात सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. वनपालांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांचा सेवाकाळ गृहित धरला यात नाही. मात्र, सरळसेवेतील आरएफओंना वेगळी नियमावली लावण्यात येत असल्यामुळे शंका उपस्थित होत आहे. खासदार, आमदारांनीही दिले पत्र सरळसेवेतील आरएफओंना १८ महिन्यांचे प्रशिक्षण कालावधी हा सेवाकाळ ग्राह्य मानून सहायक वनसंरक्षक पदावर बढती देण्यासाठी वनविभागाने अंंतिम टप्पा गाठला आहे. मात्र, ही बाब नियमबाह्य असल्याप्रकरणी याविरोधात खा. डॉ अनिल बोंडे, आ. बच्चू कडू, आ. रवी राणा, आ. प्रताप अडसड, आ. देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री, वनमंत्र्यांना पत्राद्वारे ही बढती थांबविण्याची मागणी केली आहे. सेवा ज्येष्ठता डावलून केवळ ५ वर्षे सेवा झालेल्या आरएफओंना बढती देण्याचा कुटील डाव वनविभागाने घातला असला तरी लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती