वरूड : नजीकच्या मालखेड-शेंदूरजनाघाट रस्त्यावर भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन झाडावर आदळल्याने दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, मृताचे नाव संदीप सुखदेव धाडसे (२८) व योगेश रामदास शेंद्रे (२७, दोन्ही रा. धनोडी) असे आहे. दोन्ही युवक एमएच ४० एजे ४५५६ क्रमांकाच्या दुचाकीने शेंदूरजनाघाट येथून बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास धनोडीला परत येत होते. वळण रस्त्यावर अचानक भरधाव दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती झाडावर आदळली. यात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.
शेंदूरजनाघाटचे ठाणेदार श्रीराम गेडाम यांनी पोलीस पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
शेंदूरजनाघाटचे ठाणेदार श्रीराम गेडाम यांनी पोलीस पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व म्रुतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलीसानी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.