अमरावती : स्थानिक एमआयडीसी परिसरातून एकाची दुचाकी चोरणाऱ्या चोराला राजापेठ पोलिसांनी ९ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. अनिल उर्फ बन्नी वासुदेव शेळके (३२, रा. वडरपुरा, अमरावती) असे अटक आरोपीचे नाव आहे.
१० ऑक्टोबर रोजी एका नागरिकाची दुचाकी एमआयडीसी परिसरातून चोरीला गेली होती. या प्रकरणी तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. तपासादरम्यान या गुन्ह्यात अनिल उर्फ बन्नी शेळके याचा हाथ असल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने ती दुचाकी एका साथीदारासह चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई राजापेठच्या ठाणेदार सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक पुनित कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, मनीष करपे, रवी लिखितकर, पंकज खटे, गनराज राउत, विजय राऊत व सागर भजगवरे यांनी केली.