लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : शहरालगतच असलेल्या जैववैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्पाला १६ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वापाच वाजता आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. आग विझविण्यासाठी तब्बल सहा बंब लागलेत. मात्र, या घटनेची माहिती पाच तासांनंतर पोलीस ठाण्यात देण्यात आली. यामुळे आग लागली की लावली गेली, या चर्चेला उधाण आले आहे.बडनेरा शहरालगत जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, खामगाव यांसह इतरही ठिकाणचे दवाखान्यातील वेस्ट मटेरियल निर्मूलन करण्यासाठी या ठिकाणी आणले जाते. निकामी सलाइनच्या बाटल्या, सिरिंंज, हँडग्लोव्ह्ज, इंजेक्शनच्या बॉटल यासह इतरही कचरा बॉयलरच्या साहाय्याने जाळून नष्ट केल्या जाते. याच प्रकल्पाला शुक्रवारी पहाटे सव्वापाच वाजता आग लागल्याची घटना घडली. वृत्त लिहिस्तोवर आगीत नेमके किती नुकसान झाले, हे मात्र समजू शकले नाही. आग विझविण्यासाठी तब्बल ११ वाजेस्तोवर पाण्याचे बंब पाठविण्यात आले.शहरात कुठे तरी मोठी आग लागल्याची चर्चा वाºयासारखी फिरली. मात्र, आग अत्यंत गोपनीय पद्धतीने विझविण्याचे काम सुरू होते. कारण पाच तासानंतर पोलीस ठाण्यात आगीची तक्रार झाली. त्यामुळे नेमकी आग कुठे लागली, हे शहरवासीयांना कळू शकले नव्हते. आग विझविण्यासाठी पाण्याचे सहा बंब लागलेत. यावरून आगीच्या स्वरूप मोठे असल्याचे लक्षात येते. आग विझविण्यासाठी अत्यंत गोपनीयता का बाळगली गेली, आगीबाबत पाच तासानंतर पोलीस ठाण्यात तक्रार का दिली याची चर्चा शुक्रवारी बडनेरा शहरात दिवसभर रंगली होती. पोलिसांना अंधारात ठेवण्याचा हेतू काय होता, हा प्रश्न बडनेरावासीयांकडून उपस्थित करण्यात आला आहे.प्रकल्पाजवळच माझी शेती आहे. दवाखान्याचे वेस्ट मटेरियल आणताना रस्त्यावरच पडतात. अनेकांना सुया रूतल्या आहेत. नागरी वस्तीच्या अगदी जवळ असलेल्या या प्रकल्पाला लागलेली आग बराच वेळपर्यंत धगधगत होती.- कुंदन यादव, शेतकरी, बडनेरा.जैववैद्यकीय निर्मूलन प्रकल्पाला आग लागल्याची तक्रार बडनेरा पोलीस ठाण्यात साडेअकरा वाजता प्राप्त झाली. त्यानुसार तक्रार घेण्यात आली व घटनास्थळाचा पंचनामा केला.- एस. एस. आसोलेपोलीस उपनिरीक्षक, बडनेरा.
जैववैद्यकीय कचरा प्रकल्पाची आग संशयास्पद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 9:53 PM
शहरालगतच असलेल्या जैववैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्पाला १६ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वापाच वाजता आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. आग विझविण्यासाठी तब्बल सहा बंब लागलेत. मात्र, या घटनेची माहिती पाच तासांनंतर पोलीस ठाण्यात देण्यात आली. यामुळे आग लागली की लावली गेली, या चर्चेला उधाण आले आहे.
ठळक मुद्देपोलिसांत पाच तासानंतर तक्रार : सहा बंब लागले; बडनेऱ्यात चर्चेला उधाण