शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

जिल्ह्यात बायोगॅस संयंत्राचे उद्दिष्ट घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:35 AM

बायोगॅस योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्याला या वर्षासाठी १३ लाख ५९ हजार ९४५ रुपये अनुदान मंजूर झाले आहे.

ठळक मुद्देनिम्मेच टार्गेट : शासनाकडून अनुदान उपलब्ध

आॅनलाईन लोकमतअमरावती : बायोगॅस योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्याला या वर्षासाठी १३ लाख ५९ हजार ९४५ रुपये अनुदान मंजूर झाले आहे. जिल्ह्याला १०५ एवढे बायोगॅस संयंत्रांचे उद्दिष्ट दिले आहे. मागील वर्षीच्या तुुलनेत यंदा उद्दिष्ट निम्म्याने घटले आहे.राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत ही महत्त्वपूर्ण योजना अनेक वर्षांपासून राबविली जात आहे. बायोगॅस बांधणे व त्यास शौचालय जोडणे, यासाठी अनुदान दिले जाते. टप्प्याटप्प्याने या अनुदानात वाढ झाली. तथापि, बायोगॅससाठी होणारा खर्च अन् मिळणारे अनुदान यात दुप्पट अंतर आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी ही योजना राबविण्यास अधिक प्रतिसाद दिला. अलीकडे कमी अनुदान, वाढती महागाईमुळे योजनेला थंड प्रतिसाद मिळत आहे. अशातच गतवर्षी प्रशासनाने २२० चे उदिष्ट पूर्ण केले .चालू वर्षी जिल्हा परिषद कृषी विभागाने बाजारपेठेतील अवस्था पाहिली त्याअनुषंगाने प्रचार, प्रसारास मिळालेला प्रतिसाद अनुभवला. त्यावरून तालुकानिहाय प्रथम बायोगॅसची मागणी मागविली. गतवर्षीपेक्षाही यंदा १४ तालुक्यांतून बोटावर मोजण्या इतके उद्दिष्ट मिळाल्याची माहिती आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे. यासाठी राज्य शासनाने १०५ चे बायोगॅसचे उद्दिष्ट मंजूर झाले. त्यासाठी नुकतेच १३ लाख ५९ हजार ९४५ रूपये अनुदान मंजूर झाले.असे आहे प्रवर्गनिहाय उद्दिष्टजिल्ह्यात आर्थिक वर्षात बायोगॅसचे उद्दिष्टांमध्ये सर्वसाधारण ७८, अनुसूचित जाती १५, अनुसूचित जमाती १२, असे एकूण १०५ बायोगॅस संयंत्राचे जिल्ह्यातील १४ तालुक्यांना उद्दिष्ट देण्यात आले आहे.बायोगॅस संयंत्रासाठी नऊ हजार व त्यात शौचालय जोडणीसाठी बाराशे रूपये अनुदान दिले जाते. त्यात वाढ होऊन २० हजार रुपयांपर्यंत मिळावी, अशी मागणी केली आहे. ती मंजूर झाल्यास प्रतिसाद जास्त मिळेल.- उदय काथोडे, कृषी विकास अधिकारी जि. प..