लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील काही पोल्ट्री फार्म व्यवसायीकांजवळील कोंबड्याचे संशयास्पद मृत्यू होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. मात्र, व्यवसायीकांनी चुप्पी साधल्यामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण बाहेर येत नसल्याचे दिसून येत आहे. पोल्टी फार्म व्यवसायीकांनी बर्ड फ्ल्यूचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, अधिकृत तक्रार केली जात नसल्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचे दिसून येते.अंजनगाव बारी परिसरातील एका युवा शेतकरी व पोल्ट्री फार्म व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याची माहिती दिली. सुमारे दीड हजार कोंबड्यांचे मृत्यू झाल्यामुळे तो युवा शेतकरी चिंतातुर झाला. मात्र, अन्य कोंबड्या सहीसलामत असल्यामुळे दिलासासदा मिळाला आहे. अंजनगाव बारीप्रमाणे जिल्ह्यातील अन्य ठिकाणीसुद्धा कोबंड्यांचे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांकडून अधिकृत तक्रार न झाल्यामुळे कोबंड्या दगावल्याची माहिती दडपली जात आहे. बर्ड फ्ल्यू हा घातक आजार असून तो कोबंड्याच्या संपर्कातील मानवापर्यंत पोहोचू शकतो. या मृत्यूमुळे पोल्ट्री फार्म व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोंबड्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पशुसंवर्धन विभागानेच पाऊल उचलावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.कंपन्यांकडून मोबदला घेण्यासाठीचा प्रकारपोल्ट्री फार्म व्यावसायिक ज्या कंपन्यांकडून कोबंड्यांची खरेदी करतात, त्यांच्याकडून दगावलेल्या कोंबड्यांचा मोबदला मिळतो. सोबतच कोंबड्यांना खाद्यसुद्धा कंपनीकडून पुरविले जाते. त्यामुळे काही वेगळ्या कारणास्तव जर कोंबड्यांचा मृत्यू होत असेल, तर कंपनीकडून भरपाई दिली जाते. कंपनीची बदनामी होऊ नये व मोबदला मिळत राहावा, या दृष्टीने पोल्टी फार्म व्यावसायिक पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे.शीतलहरीने मरतात कोंबड्यापोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांच्या पालनपोषणात काही कमतरता असल्यास कोंबड्या मरू शकतात. थंड वाºयाचा प्रभावात तापमान कमी-अधिक झाल्यासही कोंबड्या दगावू शकतात, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त आर.एस.पेठे यांनी दिली.जंगलात फेकतात मृत कोंबड्यापोल्ट्री फार्ममध्ये दगावलेल्या कोंबड्यांना शेताच्या धुऱ्यावर किंवा जंगलात फेकल्यास मानवी आरोग्यास धोका पोहोचू शकते. मृत कोबंड्या १० फुटापर्यंत खड्यात पुरणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणी पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्यांना उघड्यावर फेकल्या जात असल्याचे दिसून आले आहे.शवविच्छेदनानंतरच कारण होईल स्पष्टकोंबड्या मृत्यूचे निश्चित कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होऊ शकत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी सांगत आहे. ज्या शेतकºयांच्या कोंबड्या दगावत आहे, त्यांनी अधिकृत तक्रार करावी किंवा कोंबड्यांच्या शवविच्छेदनासाठी पुढे येण्याची तयारी दर्शवावी, असे आवाहन पशसंवर्धन अधिकाऱ्यांनी केले आहे. मृत पावलेल्या कोंबड्यांचे प्रयोगशाळेत शवविच्छेदन केल्यानंतरच दगावल्याचे कारण स्पष्ट होईल.सोशल मीडियावर अफवाबर्ड फ्ल्यूने कोंबड्यांचा मृत्यू होत असून कुणीही त्यांचे मास खाऊ नये, असा इशारा देत काही छायाचित्रे सोशल मीडियावर पसरविले जात आहे. ही अफवा असून बर्ड फ्लूविषयी कोणतीही बाब अद्याप पुढे आली नसल्याची ग्वाही पशुसंर्वधन अधिकारी देत आहे. सोशल मीडियावरील छायाचित्रे व इशारा ही केवळ अफवा असल्याची माहिती विभागाच्या आयुक्तांनी दिली आहे.
बर्ड फ्लूचे सावट, यंत्रणा बेसावध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 1:35 AM
जिल्ह्यातील काही पोल्ट्री फार्म व्यवसायीकांजवळील कोंबड्याचे संशयास्पद मृत्यू होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. मात्र, व्यवसायीकांनी चुप्पी साधल्यामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण बाहेर येत नसल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देकोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू : पोल्ट्री व्यावसायिकांची चुप्पी