शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

कृत्रिम प्रक्रियेतून दिला दुर्मिळ बिनविषारी सापांना जन्म, भारतातील पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 2:54 PM

भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार अमरावती येथील सर्पमित्रांनी १० जून रोजी केला.

- इंदल चव्हाण

अमरावती : भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार अमरावती येथील सर्पमित्रांनी १० जून रोजी केला. दोन दिवसांनंतर वनाधिका-यांच्या समक्ष त्यांना जंगलात सोडण्यात आले. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याची प्रतिक्रिया उपवनसंरक्षकांनी दिली.दोन महिन्यांपूर्वी पिवळ्या ठिपक्याचा कवड्या अतिशय दुर्मिळ असलेला बिनविषारी साप अमरावतीतील नवसारी भागात आढळला. नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो थोडाफार जखमी झाला. साप पडण्यासंदर्भात हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष रत्नदीप वानखडे यांना कळविण्यात आले. सदस्य श्रीकांत गावंडे, शुभम गायकवाड, विक्की गावंडे यांनी घटनास्थळी जाऊन साप पकडला. त्या मादी सापाला घरी नेले. त्याच रात्री १६ एप्रिल २०१८ रोजी तिने चार अंडी दिली. त्यानंतर सात तेथून निघून गेला. त्यातील दोन अंडी अनमॅच्युअर निघाल्याने खराब झाल्या. उर्वरित दोन अंडींना सर्पतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ह्युमिडिटी बॉक्समध्ये ठेवण्यात आले. शिवाय अंड्यांना बुरशी लागू नये म्हणून हेल्प फाऊंडेशनचे सदस्य अक्षय होले, राम करूले, सुमेध गवई, पवन गायकवाड, उमंग सवाई, संदीप सोळंके आदींनी त्याच्या प्रजननाबद्दलची अचूक माहिती गोळा करून विशेष काळजी घेतली. साधारणत: २१ ते २४ डिग्री सेल्सिअस तापमान कायम राहण्यासाठी त्यांनी माती ओली करून ठेवली. ७ जून रोजी अंडी फुटून सापाचा जन्म झाला. त्यांना वनाधिकाºयांच्या मार्गदर्शनात जंगलात सोडण्यात आले. त्याप्रीत्यर्थ आरएफओंनी त्यांचा प्रोत्साहन दिले.

५१ दिवसांचा कालावधीपिवळ्या ठिपक्याचा कवड्या साप भारतात तसा दुर्मिळच. अंडी दिल्यानंतर तेथून साप निघून जाते. पुन्हा त्या अंडींकडे फिरकत नाही. मात्र, ती अंडी विशिष्ट तापमानात रहावी, याचे भान ठेवूनच ती अंडी घालतात. ती अंडी ५१ दिवसांपर्यंत उबवली जाते. त्यानंतर त्यातून पिलं बाहेर पडते. त्यानंतर तो पिलू स्वत:चे भक्ष्य स्वत:च टिपतो. त्यामुळे त्याला मातेच्या सहकार्याची गरज भासत नाही. जानेवारी ते मार्च प्रजनन काळहा सात महाराष्ट्रातील काही भागातच आस्रढळत असून, त्यांचा प्रजनन काळ जानेवारी ते मार्च दरम्यान राहतो. मार्चमध्ये अंडी घालून ते ४८ दिवसांपर्यंत उबवण्याची प्रक्रिया होते. त्यानंतर ५१ दिवसांनी म्हणजेच जूनच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात पिल बाहेर येतात.हा साप नवसारी भागातून ताब्यात घेतला. त्याने दिलेली अंडी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात विशिष्ट तापमानात ठेवली व काळजी घेतली. पिलू बाहेर येताच उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांना कळविले. त्यांनी आमच्या कार्याची प्रशंसा केली. हे महत्त्वपूर्ण कार्य असल्याचे ते म्हणाले.- रत्नदीप वानखडे, अध्यक्ष, हेल्प फाऊंडेशन, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती