विविध चर्चा : रणजित पाटील यांच्या सभा, बॅनरवरूनही बेपत्ता परतवाडा : मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रभुदास भिलावेकर सर्वसामान्य जनतेला शोधून सापडत नसल्याची ओरड सर्वत्र आहे. विरोधक थेट आरोप करीत असताना शनिवारी येथील ब्राह्मणसभा मंगल कार्यालयात आयोजित राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या सहविचार सभेला ते अनुपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व आमदारांचे छायाचित्र बॅनरवर असताना तेथेही आ. प्रभुदास भिलावेकरांचे छायाचित्र नसल्याची चर्चा होत आहे. शनिवारी येथील ब्राह्मणसभा मंगल कार्यालयात भाजपतर्फे पदविधर मतदारसंघाचे उमेदवार तथा नगरविकास व गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची भाजपा अचलपूर शहर व ग्रामीण मंडळातर्फे सहविचार सभा ठेवण्यात आली होती. सभेला राज्यमंत्री रणजित पाटील, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, गजानन कोल्हे, सुधीर रसे, नीलेश सातपुते, अभय माथने, रविराज आदी मंचावर होते. शनिवारी ब्राह्मणसभा सभागृहात आयोजित मेळाव्यात त्यांची अनुपस्थिती काही कारणालाच नसली तरी त्या सभेच्या बॅनरवर भाजपच्या सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांचे फोटो होते. मात्र केवळ आ. प्रभुदास भिलावेकर यांचा फोटो नव्हता. आपण प्रथम पदविधर मतदारसंघाची निवडणूक लढलो तेव्हा जिल्ह्यात भाजपचे एकही आमदार नव्हते. आज नऊ आमदार असल्याचे राज्यमंत्री रणजित पाटील म्हणाले. जनतेसह विरोधकांचा आरोप मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर निवडून आले तेव्हा त्यांनी प्रण बांधला होता की, आपण मेळघाट मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेट दिल्यावरच घरी जाऊ. मात्र काही दिवसांनंतर ते मतदारसंघातून जणू गायबच झाल्याचे दिसू लागले. सतत त्यांच्यावर आमदार दिसत नसल्याचे वजा बेपत्ता असल्याचे आरोप लागत गेले. काही गावांमध्ये ‘आपण यांना पाहिल्ंत का?’ असे फलकसुद्धा लागले होते आणि हीच संधी हेरून विरोधकांनीसुद्धा संपूर्ण मेळघाट मतदारसंघात ‘कुठे गेले आमदार दाखवा, दोन वर्षांत मेळघाटचा विकास’ आदी जाहीर सभेत बोलून दाखविले होते.
भाजपलाही पडला भिलावेकरांचा विसर
By admin | Published: August 19, 2016 12:23 AM