कर्ज पुनर्गठनाची मागणी : भाजपाचे आंदोलन वरूड : शासनाने पीक पुनर्गठणाचे आदेश दिले असताना सुध्दा गणेशपूरच्या युनियन बँकेच्या व्यवस्थापकाने आडमुठेपणाचे धोरण वापरुन शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात शाखा व्यवस्थापकाला घेराव घालून तातडीने पूनर्गठीत कर्जाचे वाटप विनाअट करण्याची मागणी केली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शासनाने मुद्रांकशुल्क रद्द कला असताना गणेशपूर येथील युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापकद्वारा शेतकऱ्यांना ५०० रुपयाचा मुद्रांक बोलावण्यात आले होते.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शाखा व्यवस्थापकाला घेराव घालून मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांना मागू नये तसेच तातडीने कर्जाचे पूनर्गठण करण्याची मागणी केली. व ही मागणी मान्य करण्यात आली.व कर्ज वाटपाचे आश्वासन देण्यात आले. आंदोलनात शेतकरी वासुदेव काळमेघ, अरुण मांडवे, सुनिल निमजे,राजेश काटे, अशोक काटे, रामाजी रेवतकर, श्रावण वांगे, अशोक माळोदे, भीमराव बोरकर आदी शेतकरी उपस्थित होते.
बॅक व्यवस्थापकाला भाजपचा घेराव
By admin | Published: June 16, 2016 12:34 AM