शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

भाजप हाऊसफुल्ल; मेगाभरती बंद - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 5:33 AM

महाजनादेश यात्रा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीतून सुरुवात

सूरज दाहाट/अमित कांडलकर 

तिवसा/गुरुकुंज मोझरी (अमरावती) : महाराष्ट्राच्या विकासासाठी जे-जे कोणी उपयोगी ठरतील, त्यांच्यातील गुणवत्ता ओळखून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार-पदाधिकारी व अन्य काही जणांना भाजपमध्ये प्रवेश दिला. मात्र, आता भाजप हाऊसफुल्ल झाल्याने मेगाभरती बंद करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निघालेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेचा प्रारंभ राष्ट्रसंतांच्या गुरुकुंजातून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते.

विरोधकांकडून शहराशहरात ‘भाजपमध्ये प्रवेश देणे सुरू आहे’ अशी फलके लावण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर ज्यांच्यात क्षमता आहे, त्यांनाच प्रवेश दिल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता दिली. महाजनादेश यात्रेतून आम्ही महाराष्ट्रातल्या गावांमध्ये जाऊन जनजागृती करतोय. महाराष्ट्रात सगळ्या समस्या संपल्या, असा दावा आम्ही करत नाही. मात्र, आधीच्या सरकारपेक्षा आम्ही दुप्पट काम केले. दीड लाख शेतकऱ्यांना कृषिपंपाचे कनेक्शन, गोसे खुर्दमध्ये एक लाख हेक्टरचा सिंचनाचा पुढील टप्पा, पाच वर्षांत ५० हजार कोटींची कर्जमाफी, ३० हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते, १८ हजार गावांमध्ये पिण्याचे पाणी, ५० हजार शौचालय, २० हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग, ४० लाख कुटुंबांची बचत गटांशी जोडणी, ही आपल्या सरकारची प्रमुख कामे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकरी आत्महत्या रोखण्याचे उद्दिष्ट : राजनाथ सिंहशेतकऱ्यांच्या खात्यात आजवर १८ हजार ३६ कोटी रुपये जमाझालेत. आता उद्दिष्ट आहे ते महाराष्टÑातील शेतकरी आत्महत्या रोखण्याचे. ती उद्दिष्टपूर्ती करू, अशी ग्वाही देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.नागरिकांकडून घोषणाबाजीमहाजनादेश यात्रेचा रथ मोझरीतून जात असताना काही शेतकºयांनी कर्जमाफी करण्याची घोषणाबाजी के ली. राज्यात शेतकºयांची परिस्थिती वाईट असताना तुम्हाला शेतकºयांप्रती जाण नाही. महाजनादेश यात्रेतून तुम्ही काय साध्य करणार आहात, अशी विचारणा काही शेतकºयांनी मुख्यमंत्र्यांना केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस