शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
2
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
3
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
4
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
6
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
7
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
8
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
9
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
10
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
11
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
12
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
13
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
14
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
15
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
16
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
17
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
18
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
19
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
20
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात

वाईन विक्री विरोधात भाजपचं आंदोलन, भरचौकात थाटले प्रतिकात्मक मद्यविक्रीचे दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 12:35 PM

आज सकाळी अमरावतीतील राजकमल चौकात भाजपतर्फे राज्य सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आलं. तसेच, प्रतिकात्मक किराणा दुकान लावून त्यात वाईन विक्री करण्यात आली. 

ठळक मुद्देभाजपचे आंदोलनवाईनविक्रीला कडाडून विरोध

अमरावती : राज्य सरकारने किराणा दुकानात मद्यविक्री होणार असल्याची घोषणा केली. मात्र, या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे, अमरावती शहरातील राजकमल चौकात भाजपाने किराणा दुकानातील दारूविक्री विरोधात आंदोलन करत चक्क भर चौकात प्रतिकात्मक वाईनचं दुकान थाटून मद्यविक्री केंद्र सुरू केलं.

वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथं एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारनं मुभा दिली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका होऊ लागली आहे.

आज सकाळी अमरावतीतील राजकमल चौकात भाजपतर्फे महाविकास आघाडीसरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, प्रतिकात्मक किराणा दुकान लावून त्यात वाईन विक्री करण्यात आली. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप भाजपने केला, त्यामुळे मद्यविक्री निर्णयाचा विरोध केला जातोय. यावेळी ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यात. यावेळी पोलिसांनी भाजप नेते अनिल बोंडेसह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

शेतकऱ्यांच्या हिताच्या नावाखाली केवळ स्वत:ची घर भरणं हा एकच उद्देश्य

'शेतकऱ्यांच्या नावाखाली किराणा दुकानांत वाईन विक्री करण्याचा प्रताप या मद्यविक्री आघाडी सरकारने सुरू केला आहे. दोन वर्षातच या सरकारचे खायचे दात दिसायला लागले आहे. दारूबाजांच हित करण्यासाठी या सरकारने हा निर्णय घेतला आहे. आज वाईन आणताहेत उद्या आणखी काहीतरी आणतील. शेतकऱ्यांच्या हिताच्या नावाखाली केवळ स्वत:ची घर भरणं हा एकच उद्देश्य या वसूली सरकारचा आहे.'

शिवराय कुळकर्णी, भाजप प्रवक्ते

टॅग्स :agitationआंदोलनBJPभाजपाliquor banदारूबंदीalcohol prohibition actदारुबंदी कायदाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी