रोहित पटेल सभापती : दोन जागांसाठी दोनच अर्जलोकमत न्यूज नेटवर्कधारणी : धारणी पंचायत समितीच्या सभापतीपदी माजी आमदार राजकुमार पटेल यांचे चिरंजीव रोहित व उपसभापतीपदी जगदीश हेकडे यांची अविरोध निवड करण्यात आली. धारणी पंचायत समितीच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व दहा जागा भाजपाने जिंकत एकहाती सत्ता मिळविली होती. माजी आमदार राजकुमार पटेल यांनी भाजपात प्रवेश केल्यावर हे यश मिळविल्यामुळे त्यांची राजकीय ताकद कायम असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान सभापती व उपसभापतीपदाची निवड केवळ औपचारिकता ठरली होती. सभापतीपदासाठी राजकुमार पटेल यांचे पुत्र रोहित यांची निवड निश्चित मानली जात होती. रविवारी झालेल्या या निवडणुकीत रोहित पटेल यांनी सभापती, तर उपसभापतीपदासाठी जगदीश हेकडे यांनी अर्ज दाखल केला. दोघांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया तहसीलदार अ.गो. देवकर, नायब तहसीलदार एस.एस. सावलकर, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, अपर्णा मरस्कोल्हे, धारणीचे सहायक पोलीस निरीक्षक नरवडे यांनी पूर्ण केली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी आ. प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार राजकुमार पटेल, प्रकाश घाडगे, सदाशिव खडके, विशाल खार्वे, सचिन पटेल, पंकज माकोडे, शैलेंद्र मालवीय यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.सभापती २१ वर्र्षांचा सभापतीपदी निवड झालेला रोहित पटेल यांचे वय केवळ २१ वर्षे आहे. धारणीसारख्या आदिवासी व दुर्गम भागात कमी वयाचा सभापती होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
धारणी पं.स.वर भाजपाचा झेंडा
By admin | Published: June 26, 2017 12:09 AM