शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बच्चू कडूंच्या अचलपूर मतदारसंघात भाजपची मतविभाजनाची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 4:07 AM

या घडामोडींमुळे सतर्क झालेल्या भाजपक्षाने यावेळी बच्चू कडू नावाचा 'अडसर' विधानसभेत पोहोचूच द्यावयाचा नाही

गणेश देशमुखअमरावती : अचलपूर मतदारसंघात चळवळतील नेते अशी प्रतिमा असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी निवडून येण्याची हॅट्ट्रिक केली असली तरी कडू यांच्या विरोधात भाजपने जोरदार फिल्डिंग लावली आहे.बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेची स्थापना करून राज्यभरात त्याचा विस्तार केला. त्यांच्या अपक्ष असण्यामुळेच केंद्र शासनावर कधी त्यांनी यात्रेतून 'आसूड' ओढण्याचा प्रयत्न केला, तर कधी आक्रमक आंदोलनांतून राज्य शासनाला कोंडीत पकडले. तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना 'साले' संबोधल्याच्या मुद्यावरून बच्चू कडू यांनीच लोकसभा निवडणुकीदरम्यान थेट दानवेंच्या मतदारसंघातील राजकारण तापविले.

या घडामोडींमुळे सतर्क झालेल्या भाजपक्षाने यावेळी बच्चू कडू नावाचा 'अडसर' विधानसभेत पोहोचूच द्यावयाचा नाही, अशी रणनीती आखल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यादृष्टीने आखण्यात आलेल्या दृश्य-अदृश्य अनेक योजनांपैकी अचलपूर मतदारसंघात प्राबल्य असलेल्या माळी समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय जवळ-जवळ झाला आहे. या रणनीतीतून एकाच दगडात दोन पक्षी मारले जातील - बच्चू कडू यांचा दबदबा बसेल आणि माळी समाजाला नेतृत्वाची संधी दिली जाईल. दुसरीकडे भाजपला मात देण्यासाठी बच्चू कडूही तयारीत आहेत. विकासकार्याचे आक्रमक मार्केटिंग ते करतील, शिवाय गनिमी कावा हे बच्चू यांचे जुने हत्यार सोबतीला आहेच.रिपाइंचे राजेंद्र गवई हे अचलपुरातून मित्रपक्ष काँग्रेसच्या कोट्यातून तिकीट मागत आहेत. काँग्रेसने विधान परिषदेचे आश्वासन दिले; पण गवई मानण्यास तयार नाहीत. अखेरीस रिपाइंच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा त्यांचा मनसुबा आहे. याच मतदारसंघातून राष्टÑवादीच्या सुरेखा ठाकरे यादेखील उत्सूक आहेत. आघाडीत हा मतदारसंघ कोणाला सुटतो, यावर बरेच काही अवलंबून आहे.पाच वर्षांत काय घडले?च्५० वर्षांत तीन धरणे होती. बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून सहा धरणे झाली.च्पूर्वी दोन मोठी रुग्णालये आणि चार प्राथमिक आरोग्य केंदे्र होती. बच्चू कडू यांच्या काळात चार प्राथमिक आरोग्य केंद्रे, एक सामान्य रुग्णालय, एक स्त्री रुग्णालय, एक उपजिल्हा रुग्णालय, एक ग्रामीण रुग्णालय यांची निर्मिती झाली.च्पूर्वी अडीच हजार लोकांना श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेतून मानधन मिळायचे. कडू यांनी आंदोलन केल्यानंतर ती संख्या ३५ हजार इतकी वाढविली.च्६५ हजार रुग्णांची रुग्णसेवा बच्चू यांच्या ‘प्रहार’ ने केली. ३५ हजार जातीचे दाखले शाळांतून वाटले.च्शेतकरी, अपंग आणि अंगणवाडी सेविकांसाठी कडू यांनी वेळोवेळी आंदोलनं केली आहे.निवडणूक २०१४बच्चू कडू (अपक्ष)५९,२३४ मतेअशोक बनसोड (भाजप)४९,०६४ मतेबबलू देशमुख (काँग्रेस)३१,४७५ मतेसंभाव्य प्रतिस्पर्धीबबलू देशमुख (काँग्रेस)नंदू वासनकर (भाजप/सेना)सुरेखा ठाकरे (राष्ट्रवादी)राजेंद्र गवई (रिपाइं)दोन एमआडीसी, फिनले मिल, १८८ गावांत शुद्ध पाणी, आधुनिक तहसील कार्यालय यांची निर्मिती केली. संत्रा प्रोसेसिंग युनिट, दुग्धसंकलन केंद्र मंजूर झाले. मजुरांचा विमा काढणारा देशातील पहिला आणि एकमेव मतदारसंघ ठरला. पुन्हा संधी मिळाली, तर उभ्या केलेल्या इमारतीला नीट छपाई आणि रंगरंगोटी करता येईल.- बच्चू कडू, आमदार अचलपूर

टॅग्स :achalpur-acअचलपुरBachhu Kaduबच्चू कडूElectionनिवडणूक