ठळक मुद्देआंदोलनाला यश : दुपारनंतर खुली केली आरोग्य सेवा
आॅनलाईन लोकमतअमरावती : केंद्र शासनाने प्रस्तावित केलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलविरोधात इंडियन मेडिकल असोशिएशनच्या ७५० डॉक्टरांनी काळा दिवस पाळून प्रशासनाचे लक्ष वेधले. याविषयी संसदेत दुपारपर्यंत निर्णय झाल्यामुळे आयएमएच्या आंदोलनाला यश मिळाले. दुपारनंतरच सर्व डॉक्टरांनी आरोग्य सेवा खुली केली.आएमएने मंगळवारी दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सकाळपासून डॉक्टरांनी काळी फित लावून आंदोलन सुरु केले. आयएमएचे अध्यक्ष बी.आर.देशमुख, सचिव दिनेश वाघाडे, कोषाध्यक्ष आशिष साबू, वसंत लुंगे, पी.आर.सोमवंशी, अशोक लांडे, पंकज घुंडीयाल, भारती लुंगे, नीरज मुरके, अलका कुथे, श्यामसुंदर सोनी, मनोज गुप्ता, श्रीगोपाल राठी आदींनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले.