शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

अमरावतीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार; एक जण ताब्यात

By गणेश वासनिक | Published: November 09, 2023 10:30 PM

भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई, पुणे सायबर सेलकडून प्राप्त आयडीच्या आधारे केली चौकशी

अमरावती : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका ट्रॅव्हल्स एजन्टकडून संगणकासह विविध नावाच्या आयडी, ई- तिकीट व अन्य साहित्य ताब्यात घेतल्याची कारवाई बुधवारी रेल्वे सुरक्षा बलाने केली. संजय हरिओम अग्रवाल (५४, रा. कॉंग्रेसनगर रोड, सुंदरलाल चौक, टीबी हॉस्पिटलच्या मागे, अमरावती) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे.

भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या माहितीनुसार, पुणे येथील सायबर सेलने रेल्वे तिकिटांच्या आयडी पडताळणीचे निर्देश दिले होते. त्यानुसार आरपीएफच्या चमुने बुधवारी अग्रवाल ट्रॅव्हल ॲन्ड स्टेशनरी या प्रतिष्ठानची तपासणी केली असता अग्रवाल यांनी अधिकृत रेल्वे तिकीट एजन्ट असल्याचे सांगितले. त्यानंतर आरपीएफ चमुने चौकशीदरम्यान डेटामध्ये सापडलेल्या १३ वैयक्तिक वापरकर्ता आयडी व्यतिरिक्त त्यांच्याकडे ८ आयडी आढळून आले. भुसावळ आरपीएफने आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ४७९/ २०२३ रेल्वे कायदा कलम १४३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला भुसावळ रेल्वे न्यायालयात गुरूवारी हजर करण्यात आले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक एस.के.वर्मा, उपनिरीक्षक पल्लवी खोडे यांनी केली आहे.

संगणक, ई-तिकिट, मोबाईल जप्तपासवर्ड आणि संगणकाची तपासताना ४ क्रमांकाच्या थेट ई तिकिटाची किंमत ११७२८ आणि १६ तिकिटांची प्रवास पूर्णता किंमत ३६८६५ काढल्याबद्दल माहिती मिळाली. त्याच्या दुकानातून २२५०० रुपये किमतीचा मोबाईल व २० हजार रुपये किंमतीचा संगणक जप्त करून तपासासाठी ताब्यात घेण्यात आला. आरोपीची चौकशी आणि जबाब नोंदवल्यानंतर प्रबल डेटाकडून मिळालेला एजंट आयडी म्हणजे एकूण २७ ट्रॅव्हल-एंड रेल्वे ई-तिकीटे ३९९५९ रुपये आणि एकूण २१ वैयक्तिक यूजर आयडी मिळून ४३ ट्रॅव्हल-एंड रेल ई-तिकीटे मिळाली. याची किंमत ७६८२४ रूपये होती. या सर्व तिकिटांचे प्रति व्यक्ती ५० रूपये अतिरिक्त तिकीट भाडे लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले.